घरमहाराष्ट्रमहापालिका रुग्णालयांत रेबीज लसीचा तुटवडा

महापालिका रुग्णालयांत रेबीज लसीचा तुटवडा

Subscribe

रेबीजची लस नसल्यामुळे अनेक रुग्णांना लांबचा प्रवास करून जेजे रुग्णालय गाठावे लागत आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. ४५,९४९.२१ कोटींच्या अर्थसंकल्पात ६९३३.७५ कोटी रुपयांची तरतूद आरोग्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, रेबीजच्या लसीसाठी मुंबईकरांना धावाधाव करावी लागत आहे.

मुंबई : मुंबई गेली दोन वर्षे कोरोनाच्या विरोधात लढत आहेत. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या बृहन्मुंबई महानगरपालिकेने चांगले काम केले आहे. मात्र, याच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत कुत्रा चावल्यानंतर महत्वाची असणार्‍या रेबीजच्या लसीसाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. मुंबईतील पालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये लसीचा तुटवडा आहे. रेबीजची लस नसल्यामुळे अनेक रुग्णांना लांबचा प्रवास करून जेजे रुग्णालय गाठावे लागत आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. ४५,९४९.२१ कोटींच्या अर्थसंकल्पात ६९३३.७५ कोटी रुपयांची तरतूद आरोग्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, रेबीजच्या लसीसाठी मुंबईकरांना धावाधाव करावी लागत आहे.

मुंबईमधील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. जर कुत्रा चावला तर मुंबईत पालिकेचे जेजे रुग्णालय व्यतिरिक्त इतर सरकारी रुग्णालयांमध्ये रेबीजची लस उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी अनेकांना याचा सामना करावा लागला. रेबीजच्या लसीचा खासगी रुग्णालयात १५०० ते २००० रुपये एवढा दर आहे. सरकारी रुग्णालयात ती लस मोफत मिळते. रेबीज विरोधातील लस पालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

बोरिवलीमध्ये राहणार्‍या गौरव जोशी यांना सोमवारी रात्री १२.३० वाजता कुत्रा चावला. त्यानंतर त्यांनी बोरीवलीमधील भगवती रुग्णालयात धाव घेतली. तिथे रेबीजची लस नसल्याने ते कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयात गेले. तिथे देखील लस नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी कुपर रुग्णालयात धाव घेतली. तिथे देखील त्यांना लस उपलब्ध नाही आहे असे सांगून जेजे रुग्णालयात जाण्यास सांगितले. अखेर मंगळवारी सकाळी त्यांनी जेजे रुग्णालयात रेबीजची लस घेतली. अशाच पद्धतीचे अजून एक रुग्ण होता अंजली होनराव. त्यांनी देखील भगवती, शताब्दी रुग्णालयाची वारी केली. अखेर त्यांना देखील जेजे रुग्णालयात लस मिळाली. दरम्यान, रमेश कांबळे नावाचे रुग्ण देखील जेजे रुग्णालयात रेबीजच्या लसीसाठी आले होते. त्यांनी देखील भगवती, शताब्दी, सिद्धार्थ, कूपर रुग्णालयाची वारी केली. ९ वर्षांच्या चिमुरड्याला त्याच जखमेसह ट्रेनमधून जेजे रुग्णालयात यावे लागले.

जर एखाद्याला वेळीच लस मिळाली नाही तर पालिकेच्या हलगर्जीपणाने त्या व्यक्तीला जीव गमवावा लागेल. विशेष म्हणजे सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत रेबीजच्या लसीसाठी नागरिकांना वणवण फिरावे लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कोरोनाच्या काळात चांगले काम केले म्हणून ज्या महापालिकेचे कौतुक झाले त्या महापालिकेच्या हद्दीत अशा पद्धतीने रेबीजच्या लसीसाठी वणवण फिरावे लागणे हे दुर्दैवी आहे.

- Advertisement -

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर पालिकेचा ९ कोटींचा खर्च

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने २०१७ ते २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीत निर्बिजीकरणावर तब्बल ९ कोटींचा खर्च केला आहे. म्हणजेच पालिकेने एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणावर सुमारे ७२८ रुपये खर्च केले आहेत. पालिकेच्या माहितीनुसार २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार भटक्या कुत्र्यांची संख्या ९५ हजार १७२ होती. पालिकेने कुत्र्यांचा मृत्यू दर, प्रजनन दर, निर्बिजीकरण संख्या आदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.


हेही वाचाः Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात आज 1080 नवे रुग्ण, तर 47 जणांचा मृत्यू

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -