घरमहाराष्ट्र...तर आम्ही लोकल प्रवासावरील लसीकरणाची सक्ती मागे घेऊ; ठाकरे सरकारची कोर्टात माहिती

…तर आम्ही लोकल प्रवासावरील लसीकरणाची सक्ती मागे घेऊ; ठाकरे सरकारची कोर्टात माहिती

Subscribe

मात्र राज्य कार्यकारी समितीची येत्या 25 फेब्रुवारीला नव्या नियमावलीबाबत बैठक होणार असून, त्यात यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्या वेळच्या परिस्थितीनुसार लोकलमध्ये लससक्तीचा निर्णय योग्यच असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं.

मुंबई: मुंबई लोकल प्रवासासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे लोकल प्रवासाबाबत लसीकरणाची असलेली सक्ती मागे घेण्यास तयार असल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. तसेच मुंबई पूर्णतः अनलॉक करण्याबाबतही तीन दिवसांत आदेश देण्यात येतील, असंही सरकारनं स्पष्ट केलंय. दुसरीकडे ठाकरे सरकारने मागील वर्षी 15 जुलै, 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्टला रेल्वे प्रवासाबाबत काही सशर्त नियम प्रसिद्धीस दिले होते. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्याची परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली होती.

या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असून, विशेष सरकारी वकील अनिल अंतुरकर यांनी कोर्टात यासंदर्भात माहिती दिली. लोकल प्रवासासंबंधी तिन्ही आदेश मागे घेतले जाणार असल्याचेही त्यांनी संकेत दिलेत. मात्र राज्य कार्यकारी समितीची येत्या 25 फेब्रुवारीला नव्या नियमावलीबाबत बैठक होणार असून, त्यात यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्या वेळच्या परिस्थितीनुसार लोकलमध्ये लससक्तीचा निर्णय योग्यच असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाची परिस्थितीही सुधारतेय, त्यामुळे या प्रकरणावर 26 फेब्रुवारीला सुनावणी घेण्याची विशेष सरकारी वकिलांची विनंती मान्य करत सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचा आरोप करत वैद्यकीय सल्लागार योहान टेंग्रा यांनी अॅड. अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत एक जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते फिरोझ मिठबोरवाला यांनी राज्य सरकारच्या याच निर्णयाला फौजदारी रीट याचिकेतून आव्हान दिलेय.

लोकलमधील रेल्वे प्रवासाबाबत जारी केलेली लसीकरणाची सक्ती आम्ही मागे घेण्यास तयार आहोत अशी माहिती मंगळवारी राज्य सरकारनं हायकोर्टात दिली. मात्र नवी अनलॉकबाबत नियमावली येत्या तीन दिवसांत जारी होईल, त्यामुळे त्यात या गोष्टीबाबत विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन राज्य सरकारनं हायकोर्टाला दिलं आहे. त्यामुळे गेली दीड-दोन वर्ष सरसकट बंद असलेला मुंबई लोकलचा प्रवास आता सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचाः Mumbai Corona Update : मुंबई कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरुच, 24 तासात 20 जण

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -