घरमहाराष्ट्रसासूच्या छळामुळे महिलेने मुलाची हत्या करुन केली आत्महत्या

सासूच्या छळामुळे महिलेने मुलाची हत्या करुन केली आत्महत्या

Subscribe

पोलीस पत्नी जान्हवीने तिचा दोन वर्षाचा मुलगा शिवांशची आधी हत्या केली त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास लावून घेतला.

सासूच्या छळास कंटाळून पुण्यामध्ये एका पोलीस पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाची हत्या करुन त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी पाच वाजता ही घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. या घडनेमुळे हडपसरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.


हेही वाचा – प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक

- Advertisement -

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकात काम करणारा पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांची पत्नी जान्हवी कांबळे हिने सासूच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. जान्हवीने तिचा दोन वर्षाचा मुलगा शिवांशची आधी हत्या केली त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास लावून घेतला. हा संपूर्ण प्रकार पहाटे उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी जान्हवीने सुसाईड नोट लिहली आहे. त्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, ‘अमित (पती) तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. मात्र वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव. माझी सासू सुजाता ही माझा वारंवार छळ करतेय’ असं तिने म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -