घरमहाराष्ट्रप्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक

Subscribe

कावेरी शिंदेने तिच्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पतीचा मृतदेह विद्युत कुंपनावर फेकून देत शॉक लागून मृत्यू झाल्याचा बनाव केला होता.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शहाजानपूर येथे अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. कावेरी शिंदे असं या आरोपी महिलेचा नाव असून तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय परिसरातून तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सापळा रचून कावेरीला अटक केली.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्या झाल्याचे उघड

कावेरी शिंदेने तिच्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पतीचा मृतदेह विद्युत कुंपनावर फेकून देत शॉक लागून मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून कावेरीच्या पतीचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. आरोपी कावेरी पतीच्या हत्येनंतर फरार झाली होती.

- Advertisement -

अखेर कावेरीला अटक

पोलिसांनी घटनेचा तपास हाती घेताच कावेरीचा प्रियकर विठ्ठल आगे याला त्याच दिवशी ताब्यात घेतले. सध्या त्याला न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान कावेरीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी सुरु केली आहे. नेमकं हत्येमागचे कारण काय हे या चौकशीतून स्पष्ट होईल.

हेही वाचा – 

- Advertisement -

लग्नाला न विचारता गेली म्हणून वडिलांनीच केली मुलीची हत्या

पुन्हा नागपूर हादरले: वकीलानेच केली वकिलाची हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -