घरटेक-वेकमंगळ ग्रहावरील खड्ड्यात 'बर्फ', पाहा फोटो

मंगळ ग्रहावरील खड्ड्यात ‘बर्फ’, पाहा फोटो

Subscribe

युरोपियन स्पेस एजंसीने १५ वर्षांपूर्वी मार्स एक्सप्रेस लाँच केले होते. मंगळ ग्रहावरील पाणी आणि बर्फाचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आले आहे. या १५ वर्षांत मंगळग्रहावरील वेगवेगळे फोटो पाठवले आहेत.

मंगळग्रह नेमका कसा आहे? या संदर्भातील अनेक शोध सुरु आहेत. आता युरोपिअन स्पेस एजंसीने मंगळ ग्रहाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये मंगळग्रहावरील खड्ड्यात काहीतरी पांढरे दिसत आहे. हा पांढरा शुभ्र पदार्थ बर्फ असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. याआधी देखील मंगळग्रहावर पाणी असल्याचे नासाच्या इनसाईटने म्हटले होते. आता या नव्या फोटोने या ग्रहावर पाणी असण्याच्या शक्येवर मोहर बसली आहे, असे म्हणायला हवे.

काय आहे या खड्ड्याचे वैशिष्टय ?

युरोपिअन स्पेस एजंसीने दिलेल्या माहितीनुसार मंगळग्रहावरील कोरोलेव क्रेटर तब्बल ८२ किलोमीटर इतका आहे. हा खड्डा ५ हजार ९०५ फूट आहे. या खड्ड्यात हा पांढरा पदार्थ दिसून येत आहे. मंगळ ग्रहावर हिमपात झाला तर नाही ना? असा अंदाजही व्यक्त केला जातो. एक मात्र नक्की की मंगळ ग्रहावर असलेल्या हवामानाचा हा परीणाम असून त्यामुळेच या ग्रहावर बर्फ टिकून आहे.

- Advertisement -

मंगळावर आहे वातावरण

नासाचे इनसाईट हे यान मंगळ ग्रहावर उतरल्यानंतर त्याने तेथील वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज पाठवला होता. मंगळ ग्रहाचा अभ्यास करणाऱ्या स्पेस एजंसीजने अनेकदा मंगळ ग्रहावरील वेगवेगळ्या गोष्टी संदर्भात सांगितले आहे. या आधी बर्फावर असणारे दगड, पाणी, बर्फ आणि हवा या संदर्भातील दाखले दिलेले आहेत. पण या नव्या फोटोमुळे शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.त्यामुळे मंगळावर मानव राहू शकेल, असे हवामान आहे.

- Advertisement -

मंगळग्रहावर होत आहेत बदल

युरोपियन स्पेस एजंसीने १५ वर्षांपूर्वी मार्स एक्सप्रेस लाँच केले होते. मंगळ ग्रहावरील पाणी आणि बर्फाचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आले आहे. या १५ वर्षांत मंगळग्रहावरील वेगवेगळे फोटो पाठवले आहेत. गेल्या १५ वर्षांमध्ये मंगळग्रहावर अनेक बदल झाले आहेत. मंगळावरील वातावरणात बदल होत आहेत. पृथ्वीप्रमाणेच मंगळावर वातावरण आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम सुर्यमालेतील अन्य ग्रहांवर झाला असल्याचे देखील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -