घरमहाराष्ट्रन्यायालयात उशिरा येणे पोलिसांना पडले महागात, गवत कापण्याची मिळाली शिक्षा; काय आहे...

न्यायालयात उशिरा येणे पोलिसांना पडले महागात, गवत कापण्याची मिळाली शिक्षा; काय आहे प्रकरण?

Subscribe

परभणी : मानवत येथे दोन पोलिसांना आरोपीला न्यायालयात उशिरा नेणे चांगलेच महागात पडले आहे. न्यायालयाने पोलिसांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना गवत कापण्याची शिक्षा दिली आहे. पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा दिल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरत आहे. मात्र दोन्ही पोलिसांनी याबाबत आपली नाराजी वरिष्ठांकडे बोलून दाखवली आहे. (Late arrival in court costs police gets punishment for cutting grass Parbhani)

हेही वाचा – Maharashtra Sadan Scam : …त्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगात गेले; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

- Advertisement -

परभणीच्या मानवत येथे एका आरोपीला न्यायालयात घेऊन जाण्यास एका हवालदाराला आणि हेड कॉन्स्टेबलला 30 मिनिटे उशिर झाला. पोलिसांच्या या कृत्यामुळे न्यायाधीश चांगलेच भडकले. आरोपींऐवजी पोलिसांनाच उशिरा आल्याबद्दल न्यायाधीशांनी गावात असलेले गवत कापण्याची शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे संतप्त झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यानंतर परभणी एसपी यांनी या प्रकरणी कारवाईबाबत शिथिलतेसाठी न्यायालयाकडे अहवाल पाठवण्यात येईल असे सांगितले.

काय आहे प्रकरण ?

22 ऑक्टोबरला दोन्ही पोलीस कर्मचारी रात्री गस्तीवर होते. यावेळी त्यांनी संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या दोघांना पकडले होते. या आरोपींना सकाळी 11 वाजता सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, आरोपीसह दोन्ही पोलीस कर्मचारी सकाळी 11.30 वाजता न्यायालयात पोहोचले. पोलीस कर्मचारी उशिरा आल्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी त्या दोघांवर चांगलेच रागावले. त्यांनी थेट दोन्ही पोलिसांना गावातील गवत कापण्याची शिक्षा दिली. या असामान्य शिक्षेमुळे अस्वस्थ झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. त्यानंतर 22 ऑक्‍टोबर रोजी पोलीस स्टेशन डायरीत त्याची अधिकृतपणे नोंद करण्यात आली आणि त्याचा तपशीलवार अहवाल विभागातील उच्चपदस्थांना पाठवण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Jalna Dhangar Reservation Protest : दगडफेक प्रकरणी 15 जण ताब्यात; 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एसपी यशवंत काळे काय म्हणाले?

परभणीचे प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी ही घटना आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या जबाबासह सविस्तर अहवाल योग्य कारवाईसाठी न्यायव्यवस्थेकडे पाठवण्यात आला होता. या घटनेचे साक्षीदार असलेल्या अन्य तीन हवालदारांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -