घरक्रीडाVirat Kohli Retirement: विराट कोहली 'या' दिवशी होणार निवृत्त? करिअरबाबतचे सर्व अंदाज...

Virat Kohli Retirement: विराट कोहली ‘या’ दिवशी होणार निवृत्त? करिअरबाबतचे सर्व अंदाज ठरले खरे

Subscribe

कोहली मार्च 2028 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. या पोस्टमध्ये विराटच्या खराब फॉर्मपासून त्याच्या दमदार कमबॅकपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: 2023 सालचा एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप चांगला होता. 2023 च्या विश्वचषकात विराट कोहलीने एकूण 765 धावा केल्या आहेत. विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या कोणत्याही हंगामात एखाद्या फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. विराट कोहलीने 765 धावा करत इतिहास रचला. मात्र, अंतिम फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. (Virat Kohli may retire from international cricket in March 2028 ICC World Cup 2023)

भारतीय संघाचा पराभव झाल्यापासून विराट कोहलीबद्दल बरीच चर्चा होत आहे. विराट कोहली किती दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार? या प्रकरणावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. विराट कोहलीचा फिटनेस पाहता तो 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळू शकेल असे मानले जात आहे. पण विराट कोहलीबाबत एका ज्योतिषाची भविष्यवाणी व्हायरल होत आहे.

- Advertisement -

ज्योतिषाने केली भविष्यवाणी

या ज्योतिषाने 2016 मध्ये विराट कोहलीबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये विराट कोहलीच्या सुरुवातीपासून ते निवृत्तीपर्यंतच्या कारकिर्दीचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की कोहली मार्च 2028 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. या पोस्टमध्ये विराटच्या खराब फॉर्मपासून त्याच्या दमदार कमबॅकपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

भविष्यवाणीनुसार, असं लिहिलं होतं की, सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 हा टप्पा विराट कोहलीच्या कारकिर्दीत खूप वाईट टप्पा असेल आणि प्रत्यक्षात कोहलीला नोव्हेंबर 2019 ते सप्टेंबर 2022 दरम्यान एकही शतक झळकावता आले नाही.

- Advertisement -

तसंच, भविष्यवाणीनुसार विराट कोहली 2021 मध्ये बाउन्स बॅक करणार होता आणि त्याचा उत्कृष्ट फॉर्म 2025 पर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. विराट कोहलीने सप्टेंबर 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 आशिया चषक स्पर्धेत तीन वर्षांनंतर शतक झळकावले आणि आतापर्यंत त्याच्याबाबतीत केलेली भविष्यवाणी ही खरी ठरली आहे.

विराट कोहली कधी घेणार निवृत्ती?

याशिवाय विराट कोहलीचे दुसरे अपत्य 2021 ते 2024 दरम्यान जन्माला येईल असा अंदाज आहे. आता हा अंदाज खरा ठरतो की नाही हे पाहायचे आहे. मात्र, या अंदाजानुसार, विराट कोहलीच्या कारकिर्दीत पुन्हा एकदा ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान वाईट टप्पा येईल आणि कदाचित त्यानंतर तो निवृत्ती घेईल. आता ही भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोहलीने केले अनेक विक्रम

2008 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत मोठं यश संपादन केलं आहे. त्याने आतापर्यंत 292 एकदिवसीय सामन्यांच्या 280 डावांमध्ये 50 शतके आणि 72 अर्धशतकं झळकावली आहेत. विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विश्वचषकातील एकदिवसीय शतकांचा विक्रमही मोडीत काढला. मात्र, दोन वर्षांपूर्वी खराब फॉर्ममुळे कोहलीला टीकेला सामोरे जावे लागले होते.

(हेही वाचा: Ind vs Aus Final : शाहिद आफ्रिदीचा व्हिडीओ आला समोर; भारतीय फलंदाजांवर निशाणा साधताना काय म्हटले… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -