घरमहाराष्ट्रMaharashtra Sadan Scam : ...त्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगात गेले; मनोज जरांगेंची पुन्हा...

Maharashtra Sadan Scam : …त्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगात गेले; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

Subscribe

ठाणे : मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा आता तिव्र झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेच्या मागणीला विरोध केला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दोन्ही नेते आक्रमकपणे भूमिका मांडताना वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत. अशातच मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सदनातील घोटाळ्यावरून छगन भुजबळांवर आरोप केले आहेत. (Maharashtra Sadan Scam Chhagan Bhujbal Jail Criticism of Manoj Jarang again)

हेही वाचा – मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना दिली खास ऑफर

- Advertisement -

मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, कुठे भाजी विकत होते, कोणाच्या इथे काय करत होते, मुंबईला येऊन काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या चित्रपटात काम केले आणि कुणाचा बंगला हडप केला हे सगळे मला माहीत आहे. त्यांनी मराठी जनतेचे पैसे खाल्ले. महाराष्ट्र सदनातील जनतेचा पैसे त्यांनी खाल्ला. त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा तळतळाट लागला आणि ते तुरुंगात गेले. त्यांना तुरुंगात बेसण भाकर खावी लागली, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला होता.

मराठा समाजाची हानी होऊ देऊ नका

सभेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी म्हटले की, मराठा समाज प्रचंड संख्येने जमला आहे, याचे मनापासून कौतूक. मात्र, या गर्दीच्या नादात आपल्या हातून काहीही चुकीचं व्हायला नको. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येऊ नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो की, पुन्हा समाजाची हानी होईल. त्यामुळे आता समाजाची हानी होऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सभेला उपस्थित मराठा समाजाला केले.

- Advertisement -

हेही वाचा – ST Bus : दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई; एका दिवसात 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पन्न

…तर मराठ्यांची नंबर एकची प्रगत जात असती

दरम्यान, 1967 पासूनच्या नोंदी सापडायला सुरूवात झाली आहे. समाजाला मायबाय मानलंय, समाजाशी गद्दारी करणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय माघे हटणार नाही. आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आला आहे. 85 टक्के लढाई जिंकली आहे. 32 लाख नोंदी सापडल्या आहेत. कायद्याचे सर्व निकष पाळून शांततेत आमरण उपोषण चालू केलं. त्यांचा गुणाकार केला, तर दीड ते पावणे दोन कोटी मराठा लोकांना लाभ होणार आहे. हेच आरक्षण 70 वर्षांपूर्वी दिले असते, तर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात नंबर एकची प्रगत जात ठरली असती, परंतु प्रत्येक मुलाचे हित या मराठा आरक्षणात आहे. शांततेच्या मार्गाने आणलेली ही चळवळ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -