घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील समस्या सोडविण्याचे बळ अंगी येऊ दे; फडणवीसांचे विठूराया चरणी साकडं

महाराष्ट्रातील समस्या सोडविण्याचे बळ अंगी येऊ दे; फडणवीसांचे विठूराया चरणी साकडं

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी पर्यावरण दिंडीला हजेरी लावली. तसेच त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी घातली.

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त विठठूरायांच्या महापुजेचा तिढा सुटल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुधवारी (22 नोव्हेंबर) पंढरपुरात दाखल झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी पर्यावरण दिंडीला हजेरी लावली. तसेच त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी घातली. फडणवीस गुरुवारी (23 नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पुजा करणार आहेत.(Let the strength to solve the problem in Maharashtra come Fadnavis Vithuraya Charani Sakad)

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत म्हणून विठू माऊलींना साकडं घाऊन एवढंच मागेल की, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी, तसा आशीर्वाद आम्हाला द्यावा, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याचं बळ आमच्यात यावं असं साकडं विठू माऊली चरणी घालणार असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राजू शेट्टींनाही माझं आव्हान आहे की, त्यांनी काही तांत्रित अडचणी समजून घ्याव्या. तर सहकार मंत्री त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जुनी पेन्शन योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या आपण पंढरीत आहोत, तेव्हा पेन्शही नको आणि टेन्शनही नको. त्यांचाही प्रश्न आपण निकाली काढू, तर याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्याकडे वळती करण्यावर ते म्हणाले की, मराठवाड्यालाही त्यांचं हक्काचं पाणी त्यांना आम्ही देऊ.

हेही वाचा : Macau Casino : …म्हणून आम्ही एका फोटोवर थांबलो; बावनकुळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे जोरदार…

- Advertisement -

जातीपातीचे राजकारण करू नका

यावेळी राज्यातील जातीपातीच्या वादावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील राजकारण्यांना माझे आवाहन आहे की, आपण याच महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदलो आहेत. गावाकडे सगळे समाज गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्याच्यामुळे कुठल्याही समाजामध्ये वितुष्ट निर्माण होणार नाही याची काळजी सगळ्याच पक्षातील नेत्यांनी घेतली पाहीजे. प्रत्येक समाजाला आपली मागणी करण्याचा अधिकार आहे पण हे करत अशताना दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतली पाहीजे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -