घरमहाराष्ट्रMacau Casino : ...म्हणून आम्ही एका फोटोवर थांबलो; बावनकुळेंच्या आरोपावर संजय राऊत...

Macau Casino : …म्हणून आम्ही एका फोटोवर थांबलो; बावनकुळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा  एक फोटो ट्वीट करत, महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर बानवकुळे यांनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आपण सहकुटुंब मकाऊला असल्याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आज त्यांनी प्रसार माध्यमांसमोर येत एका फोटोच्या आधारावर इमेज खराब करता येत नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांच्यावर केला. मात्र संजय राऊत यांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. आमच्यामध्ये संस्कृती आणि माणुसकी आहे म्हणून आम्ही एका फोटोवर थांबलो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. (Macau Casino we stopped at a photo Sanjay Raut strong response to Chandrashekhar Bawankule allegation BJP)

हेही वाचा – Sanjay Raut : अद्वय हिरे कर्ज फेडायला तयार, पण…; संजय राऊत यांनी भाजपा अन् दादा भुसेंवर साधला निशाणा

- Advertisement -

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर अद्वय हिरे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना बावनकुळे असं म्हणतात की, मी 25 वर्षांपासून राजकारण आहे. फोटोवरून अशी कोणाची इमेज खराब करणं बरोबर नाही? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, बरोबर आहे त्याचं म्हणणं. हे त्यांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षातल्या सहकाऱ्यांना सांगावं भारतीय जनता पक्षातल्या. राजकीय विरोधकांची इमेज ज्याप्रकारे ते त्यांच्या शब्दात खराब करता, त्या सगळ्या वेगळ्या पक्षातील राजकीय लोकांनासुद्धा 40-50 वर्षे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये घालवली आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Sadan Scam : …त्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगात गेले; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

- Advertisement -

आमच्या कुटुंबावर, आमच्या नेत्यांवर तुम्ही ज्याप्रकारे हल्ले करता, ते संस्कृतीमध्ये बसलं, तीही विकृतीच आहे, असा आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, आता तुम्हाला कळलं असेल, काय होतं आणि काय घडतं. आमच्यामध्ये संस्कृती आणि माणुसकी आहे म्हणून आम्ही एका फोटोवर थांबलो. आमचं त्याच्याशी काही व्यक्तिगत भांडण नाही आणि असण्याचं काही कारणही नाही. पण भारतीय जनता पक्ष ज्या सैतानी पद्धतीने, ज्या निर्घृणपणे, ज्या विकृत पद्धतीने महाराष्ट्रातल्या आपल्या राजकीय विरोधकांवरती चिखलफेक करणं, खोटे गुन्हे करणं, अद्वय हिरे हे त्याचं एक उदाहरण आहे. राजकीय गुन्हेगार तुम्ही बनवत आहात, यासाठी एजन्सीचा वापर करत आहात, बदनामी करत आहात, खोटे पुरावे तयार करत आहात, ते चालतं का? मग बावनुकळेंनी त्यांच्या सहकाऱ्यांना समजावून सांगावं. आम्ही सध्या एका फोटोवर थांबलो आहोत, कारण आम्हाला माणुसकी आहे, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -