घरदेश-विदेशLive Update : पुण्यात नवले पुलाजवळ अपघात, 3 जणांचा मृत्यू

Live Update : पुण्यात नवले पुलाजवळ अपघात, 3 जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात नवले पुलाजवळ अपघात, 3 जणांचा मृत्यू

अपघातानंतर ट्रकने घेतला पेट होता, परंतु अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र आगीत अडकलेल्या 3 व्यक्तींना बाहेर काढल्यानंतर त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

24 बोट असलेल्या 6 महिन्यांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया


पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणात घेणार 6 निवडणूक रॅली

- Advertisement -

तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाकडून तेलंगणात 40 मोठ्या निवडणूक रॅली काढणार आहे. जेणेकरुन तेलंगणातील सर्व विधानसभा जागा कव्हर करता येतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 निवडणूक रॅलींना संबोधित करतील, तसेच गरज पडल्यास रॅलींची संख्या वाढवण्यात येईल, असेही समजते.


शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर

मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी


अजित पवाराचं नाव मी पुस्तकात कुठेही घेतलं नाही – मीरा बोरवणकर

महिला अधिकाऱ्यांचे संघर्ष कळावे म्हणून पुस्तक लिहिलं.

माझ्या कारकिर्दीत 4 भ्रष्ट्राचार झाले, त्याबाबत लिहिले आहे.


सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबेंना न्यायालयाने फटकारलं, बजावली नोटीस

गणवेशाविना पोलीस आयुक्त सुनील तांबे न्यायालयात आल्याने त्यांना फटकारले

सुनील तांबेंना न्यायालयाकडून नोटीस, पुढील 15 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश


शिराडोह परिसरात अहमदनगर-आष्टी रेल्वेच्या डब्याला भीषण आग

रेल्वे प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

गार्ड-साइड ब्रेक व्हॅन आणि त्याला लागून 4 डब्यांना आग लागली आहे.

आग पसरण्यापूर्वी ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

रेल्वे एआरटी (अपघात मदत ट्रेन) दौंड येथून साइटवर पाठवली.


मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळावरील दोन रनवे मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई विमानतळ सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.  मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी मंगळवारी 11 ते 5 या वेळेत बंद केलं जाईल, अशी माहिती विमानतळ ऑपरेटरने एका निवेदनात दिली आहे.


सोलापूरात ड्रग्ज फ‌ॅक्ट्री उद्ध्वस्त; 16 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

एमडी ड्रग्ज बनवणारी फ‌ॅक्ट्री उद्ध्वस्त


मीरा बोरवणकरांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद

संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत

मॅडम कमिश्नर पुस्तकातून अजित पवारांवर केले आहेत आरोप


क्रिकेटचा ऑलिम्पिकम 2028 मध्ये समावेश

मुंबईत सुरू असलेल्या ऑलिम्पिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबई, पुणे आणि उत्तरप्रदेशात आयटीचे छापे

कोवीड काळात ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात छापेमारी


निठारी प्रकरणः निठारी प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोळी आणि पंढेर यांची उच्च न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

नोएडाच्या प्रसिद्ध निठारी प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोळीची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला आहे.


सायनमध्ये बनावट जातप्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण

10 तोतया विद्यार्थ्यांवर कारवाई


कोल्हापुरात टिपू सुलतानाचं सेट्स ठेवल्यानं वाद

हिंदुत्ववादी संघटनांनी केला विरोध


मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांवर शाईफेक करणार, भीम आर्मी


मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 1 तास बंद राहणार

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

ओव्हरहेड ग्रँटी बसवण्यासाठी घेतला ब्लॉक

आज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान मेगाब्लॉक


समृद्धी महामार्गावरील अपघात प्रकरणी 2 आरटीओ अधिकारी अटकेत

आरटीओने ट्रक थांबवला असतानाचा व्हिडीओ समोर

ट्रक,ट्रॅव्हलसा धडकून अपघात, ट्र‌‌ॅव्हलसमधील 12 जणांचा मृत्यू


चिपळूनमधील उड्डाणपुलाचं काम सुरू असताना अचानक गर्डर तुटला


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावी खासदारांची बैठक

मुख्यमंत्री एनकाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी आज दुपारी 12 वाजता खासदारांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. खासदार राहुल शेवाशे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -