घरमहाराष्ट्रLok Sabha : एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा; गिरीश महाजनांची सडकून टीका

Lok Sabha : एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा; गिरीश महाजनांची सडकून टीका

Subscribe

पुढील 15 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये भाजपा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली. मात्र एकनाथ खडसे यांचे राजकीय वैरी गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. पुढील 15 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली. मात्र एकनाथ खडसे यांचे राजकीय वैरी गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Lok Sabha Elction 2024 Eknath Khadse is a lamp that has gone out Girish Mahajan severely criticized BJP maharashtra politics)

हिंगोली लोकसभेत झालेली बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजन रविवारी (एप्रिल) हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे आणइ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला गिरीश महाजन म्हणाले की, गावातील सात लोकांची ग्रामपंचायत ज्यांच्याकडे नाही, ज्यांची पत्नी जळगाव जिल्ह्यामध्ये पडली. आमदारकीमध्ये त्यांची मुलगी पडली. बँक होती ती सुद्धा गेली. त्यांच्याकडे काय राहिले आहे? जो दिवा विझलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का विचारता? असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित करत जास्त बोलणं टाळलं.

- Advertisement -

हेही वाचा – भुजबळांचाही पत्ता कट?; नव्याने सर्वेक्षण सुरू

संजय राऊतांना दिलं आव्हान

गिरीश महाजन यांना जळगावमध्ये त्यांची जागा दाखवण्यासाठीच आम्ही शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार दिला आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देतना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांना सांगा, तुम्हाला माझं चॅलेंज आहे. सर्व महाराष्ट्र सोडा आणि जळगावला येऊन बसा, एका एका जागेवर पाच लाखांच्यावर लीड देईल, मागच्या वेळेस लोकसभा मतदारसंघांमध्ये 4 लाख 65 हजारांची लीड होती. यावेळेस 5 लाखांहून अधिक लीड दिली जाणार आहे. मी तुमच्यासारखा घर कोंबडा नेता नाही, मी बाग देणारा कोंबडा नाही. घरात बसून आरडाओरड करत नाही, असा हल्लाबोल केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महायुतीकडून उमेदवारी, पण म्हणतात मी कशाला पक्षाचं वर्चस्व वाढवू? राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांचं वक्तव्य चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -