घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha 2024 : ठाकरे गटाचे भास्कर जाधव गेले कुठे? गीतेंच्या प्रचाराला...

Lok Sabha 2024 : ठाकरे गटाचे भास्कर जाधव गेले कुठे? गीतेंच्या प्रचाराला गैरहजेरी

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे सध्या आहेत तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातही विविध चर्चा करण्यात येत आहेत.

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे सध्या आहेत तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातही विविध चर्चा करण्यात येत आहेत. कारण ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जाधवांनी ठाकरे गटाचे नेते, महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराकडे देखील पाठ फिरवल्याचेच पाहायला मिळत आहे. ज्यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा करण्यात येत आहे. (Lok Sabha Election 2024 Bhaskar Jadhav absent on Anant Geete campaign)

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे नेहमीच पक्षाच्या सभांकरिता आणि कामांकरिता उत्साही असल्याचे पाहायला मिळतात. ठाकरे गटाची सभा म्हटली की ते त्या सभांमध्येही हिरीरिने सहाभागी झालेले असतात. परंतु, आता रायगड लोकसभेतील मविआचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारात ते कुठेही दिसून आलेले नाही. गुहागर विधानसभा मतदारसंघातील चारही सभांना भास्कर जाधव यांनी दांडी मारली आहे. ज्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. पण, पुतण्याची हळद उतरणी असल्याचे सांगत भास्कर जाधव यांनी प्रचाराला आलो नसल्याचे कारण सांगितले आहे. पण त्यांनी मुद्दामहून प्रचारसभेकडे पाठ फिरवल्याचे आता बोलण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : जे 50 वर्षात झाले नाही ते…, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांना चपराक

आमदार भास्कर जाधव हे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठेही दिसून येत नसल्याने आता भास्कर जाधव खरंच नाराज असल्याचे बोलले जात आहे. पण यामुळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. तर, गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हे कोकणातील राजकारणात देखील पूर्वीसारखे सक्रिय नसल्याचे दिसून आले आहे. ज्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात मविआची डोकेदुखी वाढली असून भास्कर जाधवांनी अनंत गीतेंच्या प्रचाराकडे का पाठ फिरवली आहे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

- Advertisement -

रायगड लोकसभेत महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये लढत होणार आहे. पण ठाकरे गटाचे स्टार प्रचारक असलेले आणि रायगड लोकसभेत येणाऱ्या गुहागर विधानसभेचे भास्कर जाधव आमदार आहेत. गुहागरमध्ये गीते यांच्या आतापर्यंत चार प्रचार सभा झालेल्या आहेत, पण या चारही प्रचारसभांना भास्कर जाधव गैरहजर राहिलेले पाहायला मिळत आहेत. परंतु, अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज भरताना भास्कर जाधव उपस्थित होते. पण आता त्यांची प्रचार सभांमध्ये असलेली अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करू लागली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : यंदाच्या लोकसभेत शिवसेना किती जागा लढवणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले उत्तर; वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -