घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रLok Sabha 2024 : जे 50 वर्षात झाले नाही ते..., उपमुख्यमंत्री फडणवीसांची...

Lok Sabha 2024 : जे 50 वर्षात झाले नाही ते…, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांना चपराक

Subscribe

महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आज सोमवारी प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

अहमदनगर : महायुतीकडून भाजपातर्फे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा दक्षिण अहमदनगर लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. विखेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यामुळे नगर लोकसभेत प्रचारसभेची रंगत वाढली असून आज सोमवारी (ता. 22 एप्रिल) महायुतीकडून विखेंच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर चपराक लगावत काँग्रेसच्या 50 वर्षांच्या काळात जे प्रकल्प झाले नाही, ते पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या काळात झाल्याचे यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले. (Devendra Fadnavis criticizes opponents from a meeting in Ahmednagar)

महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या गाडीला पंतप्रधान मोदींचे इंजिन आहे आणि दुसरी गाडी राहुल गांधी यांची गाडी आहे. त्या गाडीला राहुल गांधींचे इंजिन आहे. पण त्यांना कोणी इंजिन समजायला तयार नाही. कारण त्यांच्याकडे राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद, अखिलेश यादव हे सर्व स्वतः इंजिन असल्याचे सांगत आहे. पण तिथे डबे नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : यंदाच्या लोकसभेत शिवसेना किती जागा लढवणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले उत्तर; वाचा सविस्तर

इंजिनमध्ये बसायला केवळ चालकाला जागा असते. त्यामुळे तिथे अन्य लोकांना बसायला जागा नसते. सोनिया गांधींच्या इंजिनमध्ये राहुल गांधी बसणार, उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे बसणार, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसणार. त्यामुळे सामान्य माणसाला बसायला त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही. पण पंतप्रधान मोदी यांच्या गाडीमध्ये सर्वांसाठी जागा आहे, कारण पंतप्रधान मोदी यांची गाडी सर्वसामान्यांच्या विकासासाठी पुढे जात आहे, असे म्हणत विरोधकांवर सडकून टीका केली.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी कच्च्या घरात राहणाऱ्या 20 कोटी लोकांना पक्के घर दिले. 55 कोटी लोकांना शौचालय दिले. 50 कोटी ज्यांच्या घरात गॅस नव्हता, त्या लोकांना गॅस दिली. 60 कोटी लोकांच्या घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवले. 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले. 55 कोटी तरुणांना मुद्राच्या माध्यमातून 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन कोणत्याही व्याजाशिवाय दिले. 31 कोटी महिलांना आपल्या पायावर उभे करण्याचे काम मोदींनी केले, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : बँक खाते व्यवहारावर निवडणूक आयोगाची करडी नजर

तसेच, पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मुद्रा योजनेच्या माध्यमातून 20 लाखांचे लोन मिळणार आहे. ज्यामुळे आता तरुणाईला पुढे घेऊन जाण्याचे काम मोदी करत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार मिळून एकत्रित काम करत असून राज्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. तसेच, काँग्रेसच्या काळात 50 वर्षांमध्ये प्रकल्प झाले नाही, ते प्रकल्प आता मोदींच्या काळात होत आहेत, असेही फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -