घरताज्या घडामोडीआता निवडणुकीतून माघार नाही : गावित

आता निवडणुकीतून माघार नाही : गावित

Subscribe

महाविकास आघाडी, माकपचे उमेदवार पडल्यास राष्ट्रवादीच जबाबदार

दिंडोरी लोकसभा निवडणुकीतील ट्विस्ट दिवसेंदिवस वाढतच असून, आता महविकास आघाडीने नाही म्हटले तरी दिंडोरीतून निवडणूक लढविणारच असा ठाम विश्वास जे.पी. गावित यांनी व्यक्त केला आहे.

जे.पी. गावित पुढे म्हणाले की, माकप हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून महाविकास आघाडीने दिंडोरीतून उमदेवार देतांना माकपचा विचार घ्यायला हवा होता. मात्र तसे झाले नाही, दिंडोरीत माकपची मोठी ताकद असल्याने माकपने दिंडोरीची जागा लढविण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. ही पक्षाची भुमिका असल्याने आता यातून माघारी नाही. राष्ट्रवादी पवार गट महाराष्ट्रातून 10 जागा लढवित आहे त्यातील दिंडोरीची एक जागा राष्ट्रवादीने माकपला द्याची अशी मागणी माकपने केली आहे. त्याचबरोबर माकपचे कार्यकर्ते पुढील कामाला लागलेले असून कागदपत्रांची जमवाजमव, फॉर्म भरण्याची तयारी, मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या योजना आदी कामांना कार्यकर्ते बिलगले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

शुक्रवारी (दि.19 एप्रिल) माकपच्या मेळाव्यात जे.पी. गावित यांनी महाविकास आघाडीकडे दिंडोरीची जागा मागितल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नाशिकला पाठविले. ओझर विमानतळाजवळील एका रिसोर्टमध्ये राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीनंतर माकपच्या जे.पी. गावित आणि सीटूचे डॉ.डी.एल. कराड यांच्यात दिंडोरीच्या जागा लढविण्याबात बैठक झाली. मात्र, त्यातून तोडगा निघू शकला नाही. शरद पवांराशी चर्चा करुन बैठक घेण्यात येईल असे आश्वासन या बैठकीत जयंत पाटील यांनी माकपला दिले. मात्र आता या बैठकीची वाट न पाहता आम्ही कामाला लागलेलो आहोत. राष्ट्रवादीच्या हट्टामुळे जर राष्ट्रवादी आणि माकपचे दोन्ही उमेदवार पडले तर याची जबाबदारी राष्ट्रवादीची असेल असा इशाराही जे.पी. गावित यांनी दिला आहे.

दिंडोरी लोकसभेसाठी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माकपचे माजी आमदार जे. पी. गावीत यांनी दिंडोरीत जाहीर सभा घेत बंडाचा इशारा दिला आहे. तसेच शरद पवार गटाचा इथला उमेदवार पडणारच असल्याचे सांगत थेट शरद पवारांवरच त्यांनी निशाणा साधला होता. आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता गृहीत धरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अचानक नाशिक दौर्‍यावर आले.निवडणुकीच्या नियोजनासाठी मी आल्याचे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मात्र गावित यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले असेल तरी, ओझर विमानतळावर पाटील यांनी गावित यांच्यासोबत चर्चा केल्याचे सुत्रांकडून समजते.

- Advertisement -

महाविकास आघाडी, माकपचे
उमेदवार पडल्यास राष्ट्रवादीच जबाबदार
n दिंडोरीत महायुतीच्या उमेदवारासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार कच्चा असून, त्यांच्यात लढत झाल्यास महाविकास आघाडीचा उमेदवार पडणारच, यात शंका नाही. मात्र, राष्ट्रवादीने माकपला उमेदवारी दिल्यास महायुती आणि माकप यांच्यात तुल्यबळ लढत होऊन परिणाम महाविकास आघाडीच्या बाजूने येईल. यासाठी आम्ही माकपला उमेदवारी द्या, असे वारंवार सांगत आहोत. याच्या उलट महाविकास आघाडी आणि माकप अशा दोन्ही पक्षांचे उमेदवार पडल्यास यास राष्ट्रवादीच जबाबदार असेन, असा आरोप माकपचे नेते जे. पी. गावित यांनी केला आहे. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीला ३२.३८ टक़्के अर्थांत ३ लाख ६८ हजार ६९१ मते होती तर माकपला ९.६२ टक्के मते अर्थार्ंत १ लाख ९ हजार ५७० मते मिळाली होती. दिंडोरीत माकपचा स्वतंत्र मतदार वर्ग असल्याने या भागात माकपचा दबदबा असल्याचे मानले जात आहे. यामुळेच दिंडोरी लोकसभेसाठी माकपकडून तिकीटाची मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -