घरमहाराष्ट्रLok Sabha 202 : आंबेडकरांना प्रेशर कुकर, तर जानकरांना मिळाली शिट्टी; निवडणूक...

Lok Sabha 202 : आंबेडकरांना प्रेशर कुकर, तर जानकरांना मिळाली शिट्टी; निवडणूक आयोगाकडून चिन्हाचे वाटप

Subscribe

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, रासपचे महादेव जानकर आणि प्रहार संघटनेचे दिनेश बूब यांना उमेदवारी चिन्ह बहाल करण्यात आली.

नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. राज्यासह देशात लोकसभेचे पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. यासाठी आज (ता. 08 एप्रिल) केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, रासपचे महादेव जानकर आणि प्रहार संघटनेचे दिनेश बूब यांना उमेदवारी चिन्ह बहाल करण्यात आली. (Lok Sabha Election 2024 Central Election Commission awarded symbols to Prakash Ambedkar, Mahadev Jankar)

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज अनेक उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आली. यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आले आहे. मविआ आणि वंचितची एकत्र निवडणूक लढण्याची चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर त्यांनी अकोल्यातून स्वतःच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली. ज्यामुळे आता अकोला लोकसभेत तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. कारण अकोल्यात मविआकडून काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील आणि महायुतीकडून भाजपातर्फे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Narendra Modi : दहशतवाद आणि नक्षलवाद वाढीसाठी काँग्रेस जबाबदार, पंतप्रधान मोदींचे शरसंधान

त्याशिवाय, महायुतीचे परभणी लोकसभेतील उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, महादेव जानकर यांनी त्यांना परभणीतून उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु, ती चर्चा फिस्कटल्याने महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या कोट्यातून जानकरांनी उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे यावेळी परभणी लोकसभेत मविआतील ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

अमरावतीतून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दिनेश बूब यांनाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे. अमरावतीत महायुतीकडून भाजपातर्फे विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राणा यांनी स्वतःच्या पक्षाचा राजीनामा देत भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी त्याविरोधात आक्रमक घेत राणांच्या विरोधात आपल्या संघटनेतील शिलेदाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अमरावतीतील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. तर अमरावती लोकसभेची निवडणुकही रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : जाहीरनामा नव्हे त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे; मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -