घरराजकारणलोकसभा 2024Lok Sabha Election 2024 : ...कमळच आहे डोक्यात; रोहिणी खडसेंची अर्चना पाटलांवर...

Lok Sabha Election 2024 : …कमळच आहे डोक्यात; रोहिणी खडसेंची अर्चना पाटलांवर टीका

Subscribe

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या उस्मानाबादच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचारातील एक व्हिडीओ सध्या असाच व्हायरल होतो आहे. त्यांचा हा व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे काम वेगाने राज्यात आणि देशात सुरू आहे. सगळेच पक्ष जोरात प्रचाराला लागले आहेत. या प्रचारादरम्यान अनेक गमतीजमती घडत असतात. त्याची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगते. महायुतीच्या उस्मानाबादच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचारातील एक व्हिडीओ सध्या असाच व्हायरल होतो आहे. त्यांचा हा व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024 Rohini Khadse slams Archana Patil over party expansion in Osmanabad)

महायुतीच्या उमेदवार असल्या तरी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. प्रचारासाठी गावागावात फिरताना त्यांना तुम्ही या भागात राष्ट्रवादी वाढवणार का, असं विचारलं असता, त्यांनी मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, अशी विचारणा केली. त्यांचं हे उत्तर सोशल मिडीयावर चांगलंच गाजतं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कारलं कडू ते कडूच राहणार…, म्हणीतून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा

काय म्हणाल्या अर्चना पाटील? What did Archana Patil say?

बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं वर्चस्व नाही. फक्त आमदार राजेंद्र राऊत आहेत. त्यांचाच इथे गट आहेत. तुम्ही इथे राष्ट्रवादी वाढवणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी अर्चना पाटील यांना विचारला. यावर त्यांनी मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, अशी विचारणा केली. मी महायुतीची उमेदवार आहे. मी महायुतीचाच प्रचार करणार आहे. फिर एक बार मोदी सरकार, अब की बार चारसो पार, हेच आमचे लक्ष्य आहे. आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे, असं अर्चना पाटील म्हणाल्या. राजेंद्र राऊत हे महायुतीचे घटक आहेत. माझा नवरा भाजप आमदार आहे. इथून मी निवडणूक लढवते आहे. त्यातच मला राजेंद्र राऊत यांचा पाठिंबा असल्याने महायुतीची संख्या जास्त असणार आहे, असे पाटील म्हणाल्या. या उत्तरावरून पाटील यांच्यावर चांगलीच टीका होते आहे. त्यांचा हा व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024 Rohini Khadse slams Archana Patil over party expansion in Osmanabad)

- Advertisement -

ट्विटमध्ये काय? What’s in the tweet?

“टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात…
फक्त कमळच आहे डोक्यात,
घड्याळ आहे उसनवारीत..!”,

असे ट्विट रोहिणी खडसेंनी केलं आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : सातारा मतदारसंघात नवा ट्विस्ट; उदयनराजे तयारीत, आता नरेंद्र पाटीलही इच्छूक

मूळच्या भाजपच्या असलेल्या अर्चना पाटील या निवडणुकीसाठी तडजोड म्हणून राष्ट्रवादीत आलेल्या आहेत, हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून उघडपणे दिसत असल्याचं खडसे यांना म्हणायचं असावं. कारण, शेवटी आपला मूळ पक्ष असलेला भाजप, त्याचं चिन्ह कमळ हेच त्यांच्या डोक्यात आहे. आणि कितीही म्हटलं तरी हे घड्याळ हे काही काळापुरतं उसनं बांधलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. (Lok Sabha Election 2024 Rohini Khadse slams Archana Patil over party expansion in Osmanabad)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -