घरमहाराष्ट्रPolitics : औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा...; मोदींवरील टीकेवर बावनकुळेंचे ठाकरेंना...

Politics : औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा…; मोदींवरील टीकेवर बावनकुळेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा राम राम करणं कधीही चांगलं, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मुंबई : भूत पाहिले की आपण राम राम म्हणतो, तसे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव दिसू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम राम म्हणू लागलेत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Lok Sabha Election 2024 Chandrasekhar Bawankules reply to Uddhav Thackeray on his criticism of Narendra Modi)

बावनकुळे यांनी ट्वीट करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत राम राम करत फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा राम राम करणं कधीही चांगलं. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले, पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात. सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Onion export : …मग उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे ढोल बडवा, ठाकरे गटाने मोदी सरकारला सुनावले

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, फक्त मतं मिळविण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोकणची आठवण झाली. कोकण वादळात सापडलं तेव्हा उद्धव ठाकरे घरात बसून होतात तर देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. मोदी आणि नारायण राणेंच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतो आहे. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण फिरतय जातींभोवती; नेत्यांकडूनही हीच रणनिती

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -