घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal: नाशिक घ्या, पण भुजबळांनाच उमेदवारी द्या; शहांचा राष्ट्रवादीला शब्द

Chhagan Bhujbal: नाशिक घ्या, पण भुजबळांनाच उमेदवारी द्या; शहांचा राष्ट्रवादीला शब्द

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकची जागा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागितली. त्यांनी ती जागा तुम्ही घ्या पण तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या, असं म्हटलं आहे.

नाशिक: नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असला, तरी या जागेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत असल्याचं अनेकदा म्हटलं जात होतं. पण आता मात्र स्वत: मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत खुलासा केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकची जागा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागितली. त्यांनी ती जागा तुम्ही घ्या पण तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या, असं म्हटलं आहे. अमित शहांनी असं म्हटल्याचं मला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं असल्याचं भुजबळांनी सांगितलं. थोडक्यात भुजबळ यांनी ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडेच असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी आपण भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडूणक लढवणार आहोत, या केवळ चुकीच्या बातम्या असल्याचंही म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024 Chhagan Bhujbal Take Nashik but nominate Bhujbal Amit Shah word to Ajit Pawar and Praful Patel)

- Advertisement -

कमळ चिन्हावर लढणार हे साफ खोटं

कमळ चिन्हावर वगैरे मी लढणार नाही ही बातमी साफ खोटी आणि निराधार आहे. अजित पवारांनी ही जागा माहितली. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, नाशिकची जागा हवी असले तर घ्या पण छगन भुजबळांना उमेदवारी द्या. या पलिकडे मी फार काही सांगू शकत नाही. त्यामागे काय आहे ते आता महायुतीचे नेते ठरवतील. माझ्याकडे कोणीही चिन्हाबाबत मागणी केली नाही, चर्चा केली नाही काहीही घडलेलं नाही, असं भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज ठाकरेंच्या पाठिंब्याने ताकद वाढणार

छगन भुजबळांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, एखादा कार्यकर्ता जरी जोडला गेला तर आपल्याला आनंद होतो. राज ठाकरे तर एका पक्षाचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. निश्चितपणे लोकमानसांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने, आमची ताकद वाढणार आहे, असं भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha 2024: मुंबईतलं जागावाटप करताना विश्वासात घेतलं नाही; वर्षा गायकवाडांची नाराजी कायम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -