घरमहाराष्ट्रSanjay Raut : मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचं आहे; संजय राऊतांनी साधला...

Sanjay Raut : मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचं आहे; संजय राऊतांनी साधला निशाणा

Subscribe

रामटेक येथे बुधवारी (10 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपाचे उमदेवार नितीन गडकरी आणि शिवसेनेचे रामटेकचे उमदेवार राजू पारवे यांच्या समर्थनात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी लोकशाही धोक्यात आहे, असं सांगणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मोदींना देशामध्ये पुतिन मॉडेल आणायचं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे

मुंबई : रामटेक येथे बुधवारी (10 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपाचे उमदेवार नितीन गडकरी आणि शिवसेनेचे रामटेकचे उमदेवार राजू पारवे यांच्या समर्थनात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी लोकशाही धोक्यात आहे, असं सांगणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मोदींना देशामध्ये पुतिन मॉडेल आणायचं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024 Thackeray Group Mp Sanjay Raut Allegation Narendra Modi wants to bring Putin model in the country)

संविधान धोक्यात असा खोटा प्रचार विरोधकांकडून होत असल्याचा आरोप मोदींना केला आहे. असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणली आहे, ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकाादायक आहे. प्रधानमंत्र्यांनी इतक खोट बोलू नये या मताचे आम्ही आहोत. राजकारणात लोकं खोट बोलतात, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीने मर्यादा पाळल्या पाहिजेत, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे. राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये विरोधकांनासुद्धा महत्त्व आहे, हे मोदी मानायला तयार नाहीत. मोदींना लोकसभा आणि विधानसभा या विरोधकांशिवाय हव्या आहेत. मोदींना देशामध्ये पुतिन मॉडेल आणायचं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : …तरीही सांगलीत जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली; राऊतांकडून काँग्रेसवर निशाणा

नरेंद्र मोदी यांना विरोधक नको आहेत. विरोधक त्यांना जेलमध्ये हवे आहेत. संविधानाला सगळ्यात मोठा धोका असेल ती मोदींची विचारसरणी आहे, मोदींची भूमिका आहे. खोटं बोलायचं, विरोधकांना बदमान करायचं, विरोधकांवर खोटे आरोप करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सर्व भ्रष्ट्राचारी आणि खंडणीखोर लोकांना आपल्या पक्षात घायचं, हा सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला धोका आहे.

- Advertisement -

काँग्रेसने गरजेनुसार संविधानात बदल केले (Congress made changes in the constitution as per need)

नितीन गडकरी म्हणाले की, काँग्रेसने 80 वेळा संविधान तोडलं आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, त्याला संविधान तोडणं बोलत नाही. त्याला गरजेनुसार देशाच्या आणि राष्ट्राच्या गरजेनुसार बदल करणं म्हणतात. डॉ. आंबेडकरांनी त्याला मान्यता दिली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – Politics : कृषिप्रधान म्हणवणाऱ्या देशाला कृषिमंत्री नाही; अमोल कोल्हेंनी लगावला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -