घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : दक्षिण मुंबई लढायची भाजपाला इच्छा होती, पण...; फडणवीसांनी...

Lok Sabha 2024 : दक्षिण मुंबई लढायची भाजपाला इच्छा होती, पण…; फडणवीसांनी व्यक्त केली खंत

Subscribe

महायुतीमधील दक्षिण मुंबई लोकसभेचा तिढा सुटला असून शिवसेना शिंदे गटाला ही जागा स्वतःकडे ठेवण्यात यश आले आहे. या लोकसभेतून ही शिवसेना नेत्या यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेबाबतचा महायुतीतील तिढा सुटला आहे. महायुतीमध्ये ही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली असून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेवरून सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये शिवसेनेला ही जागा स्वतःकडे ठेवण्यात यश आले आहे. पण यामुळे भाजपाच्या गोटात नाराजी असल्याचे पाहायला मिळत असून स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis reaction on Yamini Jadhav candidature)

शिवसेना शिंदे गटाकडून आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर होताच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यामिनी जाधव यांच्या उमेदवारीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, या जागेचा निर्णय आधीच झाला होता. मुंबईमध्ये तीन जागा या भाजपाने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या अशा प्रकारचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता. सुरुवातीच्या काळात दक्षिण मुंबईची जागा ही आम्ही लढावी, असे आमच्या मनात होते. त्यानुसार तयारी देखील सुरू करण्यात आली होती. पण जवळपास 20-25 दिवसांपूर्वीच हा निर्णय झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, फडणवीसांनी या जागेबाबत मत व्यक्त करताना अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबई शिवसेनेकडेच, यामिनी जाधवांना उमेदवारी जाहीर

दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपाने दावा केला होता. भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मार्च महिन्यात तर आमदार राहुल नार्वेकर यांनी हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नार्वेकरांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात होते. पण ऐनवेळी आता महायुतीने यामिनी जाधवांना उमेदवारी देऊ केली आहे.

- Advertisement -

कोण आहेत यामिनी जाधव?

भायखळा विधानसभेच्या उमेदवार असलेल्या यामिनी जाधव या दक्षिण लोकसभा लढवण्यास इच्छुक होत्या. त्यानुसार त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा देखील झाली होती. त्यानंतर यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यामिनी जाधव यांना मानणारा मोठा मतदारवर्ग या संपूर्ण लोकसभेत आहे. नगरसेविका पदापासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. ज्यामुळे त्यांना या लोकसभेची चांगली जाण देखील आहे.

हेही वाचा… Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -