घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : संजय मंडलिकांना विजयी करण्यासाठी धनंजय महाडिकांची मतदारांना ऑफर

Lok Sabha 2024 : संजय मंडलिकांना विजयी करण्यासाठी धनंजय महाडिकांची मतदारांना ऑफर

Subscribe

खासदार संजय मंडलिकांना विजयी करण्यासाठी महायुतीकडून प्रचार करण्यात येत आहे. त्याचमुळे कोल्हापुरातील भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंडलिकांना विजयी करण्यासाठी मतदारांना ऑफर दिली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेत यंदा शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून शिवसेनेतर्फे खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मंडलिकांसमोर छत्रपतींच्या नावाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पण आता महायुतीच्या सर्व नेत्यांकडून मंडलिकांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत आहे. त्याचमुळे आता कोल्हापुरातील भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंडलिकांना विजयी करण्यासाठी मतदारांना अनोखी ऑफर दिली आहे. (Lok Sabha Election 2024 Dhananjay Mahadik offer to voters to win Sanjay Mandlik)

महायुतीचे कोल्हापुरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी आज कागल येथे प्रचार सभा घेण्यात आली. या प्रचारसभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी कागल आणि चंदगड तालुक्यातील मतदारांमध्ये अनोखी पैज लावत त्यांना ऑफर दिली. यावेळी ते म्हणाले की, कागल तालुक्यात हसन मुश्रीफ आणि स्वतः संजय मंडलिक आहेत. तर चंदगड तालुक्यातही चांगली परिस्थिती आहे. यामुळे संजय मंडलिक यांना कोणत्या तालुक्यातून जास्त मताधिक्य मिळते ते पाहू.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : कोणत्या आधारावर आम्हाला नकली म्हणता? उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांना सवाल

त्यामुळे, मी सर्वांना आवाहन करतो की चंदगड तालुक्यापेक्षा तुम्ही कागल तालुक्यातून जास्त लीड दिले तर पाच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देऊ. चला तर मग लागली शर्यत… यामध्ये मी आणि संजय मंडलिक आम्ही दोघेही आहोत. मी अडीच कोटींचा निधी देणार आणि संजय मंडलिक अडीच कोटींचा निधी देतील. या शर्यतीत आम्ही दोघे आहोत हे ध्यानात ठेवा, नाहीतर तुम्ही उद्या मला एकट्याला धराल. राज्यात आणि देशात आमचे सरकार आहे, तुमचे सरकार आहे. हे सरकार म्हणजे आपले सरकार आहे. जो कोणी जे काही मागेल ते इथे मिळेल, असेही खासदार महाडिक यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरातील राजकारण तापले आहे. कारण विद्यमान खासदार, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्यावर खालच्या पातळीत टीका केल्याने मविआच्या नेत्यांनी मंडलिकांवर निशाणा साधला आहे. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांच्याकडून करण्यात आले, ज्यानंतर कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : धैर्यशील मानेंची डोकेदुखी वाढणार, हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -