घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : लेकीसाठी वडिलांची धाव! शरद पवार पहिल्यांदाच करणार...

Lok Sabha Election 2024 : लेकीसाठी वडिलांची धाव! शरद पवार पहिल्यांदाच करणार सुप्रिया सुळेंना मतदान

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानप्रक्रिया पूर्ण झाली. तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार 7 मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात पवार कुटुंबासाठी अटीतटीची लढत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघही आहे.

पुणे : लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानप्रक्रिया पूर्ण झाली. तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार 7 मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात पवार कुटुंबासाठी अटीतटीची लढत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघही आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईऐवजी बारामती लोकसभा मतदारसंघातून मतदान करणार आहेत. बारामतीच्या माळेगावमधून शरद पवार मतदान करणार आहेत. (Lok Sabha Election 2024 In Sharad Pawar Will Vote to Supriya Sule First Time In Baramati)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 1967 पासून पवार हे बारामतीच्या रिमांड होम या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत होते. 2014 पर्यंत ते पवार कुटुंबीयांसोबत रिमांड होम येथे मतदान करत होते. परंतू, बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी मुंबईमधील रहिवासी असणे गरजेचे होते, म्हणून शरद पवार यांनी बारामती येथील मतदान वर्ग करून मुंबई येथील सिल्वर ओक असा पत्ता दिला होता आणि नंतर त्यांची बीसीसीआयच्या बॉडीवर नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? गुजराती रहिवाश्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारला

यंदाच्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन गटांत निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे बारामतीतील पवार कुटुंबातील ही निवडणूक कोण जिंकत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

मंगळवार 7 मे रोजी बारामतीत मतदान पार पडणार असून, मतदानाच्या दिवशी शरद आपल्या गोविंदबाग येथील निवासस्थानी दिवसभर थांबणार आहेत. दरम्यान, शरद पवारांनी लोकसभा निवडणूकीमध्ये 22 दिवसांत 52 सभा घेतल्या आहेत. रविवार 5 मे रोजी बारामतीत सांगता सभा झाली. या सभेत शरद पवारांना थकवा जाणवत होता. त्यामुळे पुढील काही शरद पवार आराम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे पुण्यातील काही नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024: वडेट्टीवारांचं डोकं फिरलंय; करकरेंवरील वक्तव्यावरून शिंदेंची टीका

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -