घरमहाराष्ट्रLok Sabha : संजय राऊत सांगलीत असतानाच काँग्रेस नेता म्हणतो, उमेदवारीबाबत चांगली...

Lok Sabha : संजय राऊत सांगलीत असतानाच काँग्रेस नेता म्हणतो, उमेदवारीबाबत चांगली बातमी येईल

Subscribe

सांगली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सांगली आमचीच असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर ते शुक्रवारी तीन दिवसांसाठी चंद्रहार पाटील यांच्या दौऱ्यासाठी सांगली दौऱ्यावर आहेत. मात्र सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी पत्र लिहत सांगलीचा जागा काँग्रेसची असून ती आपण सोडायची नाही. उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल, असे म्हटले आहे. (lok sabha election 2024 Sangli Constituency Sanjay Raut in Sangli Congress leader says good news regarding candidature)

हेही वाचा – Lok Sabha : कमळाबाईच्या रिमोटने चालते शिंदेंची शिवसेना; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवर विरोधकांची टीका

- Advertisement -

विशाल पाटील यांनी पत्र ट्वीट करताना म्हटले आहे की, मागच्या काही वर्षात सांगलीत काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे, असे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दिवंगत वसंतदादा पाटील, दिवंगत पतंगराव कदम साहेब, दिवंगत गुलाबराव पाटील, दिवंगत प्रकाशबापू पाटील, दिवंगत मदनभाऊ पाटील, दिवंगत आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो आहे. याशिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्यावतीने विश्वजित कदम सर्व प्रयत्न करत आहेत, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Rohit Pawar : हातात खेकडा पकडणं रोहित पवारांना पडलं महागात; PETA कडून कारवाईची मागणी

काँग्रेसचा गड लढू आणि जिंकू

विशाल पाटील यांनी म्हटले की, या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात, याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल, याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू असं विशाल पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -