घरमहाराष्ट्रSanjay Nirupam : महाराष्ट्र काँग्रेस उद्धव गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही;...

Sanjay Nirupam : महाराष्ट्र काँग्रेस उद्धव गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही; का म्हणाले निरुपम असं?

Subscribe

Lok Sabha Election 2024 : निरुपम यांनी पुन्हा X या सोशल मीडियावरून पोस्ट करत महाराष्ट्र काँग्रेसवर टीका केली आहे. निरुपम म्हणतात, आणखी काही काळात शिवसेना उद्धव गटात महाराष्ट्र काँग्रेस विलीन झाल्यास, त्याचं आश्चर्य वाटायला नको.

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नेता संजय निरुपम यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर तसेच महाराष्ट्र काँग्रेसवर तोंडसुख घेतलं होतं. तेव्हापासून सातत्याने निरुपम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. आजही पुन्हा त्यांनी X या सोशल मीडियावरून पोस्ट करत महाराष्ट्र काँग्रेसवर टीका केली आहे. निरुपम म्हणतात, आणखी काही काळात शिवसेना उद्धव गटात महाराष्ट्र काँग्रेस विलीन झाल्यास, त्याचं आश्चर्य वाटायला नको. (Lok Sabha Election 2024 Sanjay Nirupam criticised congress and thackeray group over lok sabha candidate)

निरुपम यांची पोस्ट काय?

महाराष्ट्रातील दीड कोटी मुसलमान केवळ आणि केवळ काँग्रेसलाच मते देतात.
मात्र, सध्या हा संपूर्ण समाज काँग्रेसवर नाराज आहे.
का?
एवढी निष्ठा दाखवूनही काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत एकाही मुसलमान उमेदवाराला संधी दिली नाही.
असं पहिल्यांदाच झालं आहे.
उत्तर – मध्य मुंबईतून तिकीट मिळेल अशी एका नेत्याला अशा होती, त्यांना पण पक्षाने धोका दिला.
अशी चर्चा आहे की, काँग्रेसच्या मुसलमान मतांवर डोळा ठेवून असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या नेत्याचे तिकीट कापले.
मी यापूर्वीच सांगितले होते की, महाराष्ट्रात काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर लोटांगण घालण्याच्या तयारीत आहे.
त्यामुळेच भविष्यात महाराष्ट्र काँग्रेस या पक्षात विलीन झाले, तर आश्चर्य वाटायला नको.
दरम्यान, या सगळ्यामुळे मुसलमान समाज काँग्रेसच्या विरोधात गेला असल्याचा दावा देखील निरुपम यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे माजी नेता संजय निरुपम यांना काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावर निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र, या जागेवर उद्धव गटाने उमेदवाराची घोषणा केली. उद्धव गटाने येथून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली. अमोल कीर्तिकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे आपण कीर्तिकर यांच्यासाठी प्रचार करणार नाही, अशी भूमिका निरुपम यांनी घेतली. त्यानंतर, निरुपम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. निरुपम यांनी देखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर सातत्याने निरुपम चर्चेत आहेत ते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे. दरम्यान, शनिवारी काँग्रेसचे आणखी एक नेता नसीम खान यांनी देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024 Sanjay Nirupam criticised congress and thackeray group over lok sabha candidate)

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Congress : इथून पुढे काँग्रेसचा प्रचार नाही, नसीम खान यांची उघड नाराजी

प्रकरण काय?

मुंबईतील चांदिवली विधानसभेचे माजी आमदार आणि स्टार प्रचारक नेते नसीम खान यांनी पक्षावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. खान यांनी शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची ही नाराजी समोर आली. त्यानंतर आता त्यांनी आपल्या नाराजीचे स्पष्ट कारण प्रसार माध्यमांसमोर सांगितले आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाचा एकही उमेदवार दिला न गेल्याने मला वाईट वाटले असून यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असे काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. 48 लोकसभांमध्ये अल्पसंख्याक समाजाचा एकही उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये पक्षाबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्रातून विविध अल्पसंख्याक संघटनेच्या नेत्यांनी, त्या संघटनेच्या प्रमुखांकडून फोनवरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती नसीम खान यांनी दिली. याच प्रकरणाचा धागा पकडून निरुपम यांनी पक्षावर टीका केली आहे.

हेही वाचा – Maharashtra Congress : नसीम खान माझ्यासाठी उभे राहतील – वर्षा गायकवाड

दरम्यान, वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने मला काहीच अडचण नाही. मात्र, काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक समाजाचा एकही उमेदवार न देण्याचे नेमके कारण काय आहे, हे स्पष्ट करावे. याबाबत मला लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. मी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता तसेच कार्यकारी अध्यक्ष असल्याने याबाबतचा प्रश्न मला विचारण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नांशी मी सुद्धा सहमत असून पक्षाची जी भूमिका आहे, ती या निवडणुकीत का डावलण्यात आली? का कोणताही अल्पसंख्यांक उमेदवार देण्यात आलेला नाही, असा प्रश्न मलाही पडलेला आहे, त्यामुळे मी याबाबतचा ठोस निर्णय घेत स्टार प्रचारकाचा राजीनामा दिला आहे, असे नसीम खान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याच आधारावर निरुपम यांनी मुसलमान समाज काँग्रेसविरोधात बंडखोरी करण्याच्या विचारात असल्याचा दावा केला आहे. (Lok Sabha Election 2024 Sanjay Nirupam criticised congress and thackeray group over lok sabha candidate)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -