घरताज्या घडामोडीSanjay Raut : तुरुंगातून गुंडांना सोडत त्यांचा राजकारणासाठी वापर; राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर...

Sanjay Raut : तुरुंगातून गुंडांना सोडत त्यांचा राजकारणासाठी वापर; राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप

Subscribe

ठाणे शहरात शुक्रवारी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अचानक दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. याच राड्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : ठाणे शहरात शुक्रवारी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अचानक दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. याच राड्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘तुरुंगातून गुंडांना सोडायचं, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या पोलिसांना सोडायचं आणि त्यांचा वापर या राजकारणासाठी करून घ्यायच’, असा आरोप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. (Lok Sabha Election 2024 Shiv sena Thackeray Group Leader Sanjay Raut Slams CM Eknath Shinde On outcry in the rally of naresh mhaske in Thane)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या रॅलीत झालेल्या राड्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “ठाणे आणि डोंबिवलीत अनेक गुंड मिळून त्यांचा पक्ष निर्माण झालेला आहे. शिवसैनिकांचा तो पक्ष नाही. तुरुंगातून गुंडांना सोडायचं, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या पोलिसांना सोडायचं आणि त्यांचा वापर या राजकारणासाठी करून घ्यायच. ही सध्याची या राज्यातील स्थिती आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : राहुल गांधींकडे कोटींची संपत्ती पण घर नाही; तर करण भूषण सिंगांकडे 27 लाखांची शस्त्रे

“राज्याचे मुख्यमंत्री आणि गुंडांची टोळी यांचे कसे घनिष्ठ संबंध आहेत, ते कसे वाढत चालले आहेत. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांचे 10 ते 12 गुंडांसोबतचे फोटो प्रसिद्ध केले होते. ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कल्याण, डोंबिवल आणि ठाण्यात आपल्या फायद्यासाठी अनेक गंभीर गुन्ह्यातील गुंड आपल्या पक्षात घेऊन दहशतवाद निर्माण करत असल्याचेही मी निदर्शनास आणले होते. त्यामुळे त्यांच्या (श्रीकांत शिंदे) रॅलीत गुंड टोळ्या सहभागी झाल्या आणि त्याच टोळ्यांचा आपापसात गँगवॉर झाला. ही बातमी आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

“राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोळ्याला पट्टी लावून बसलेत किंवा उघड्या डोळ्याने हे सगळं सहन करत आहेत. ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत. जे तुरुंगात जायला पाहिजे अशी देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती. त्यांना शिवसेना फडणवीस गटाने उमेदवारी दिली. त्यांचेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फडणवीस जात आहेत. हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांवर टीका केली.


हेही वाचा – Lok Sabha 20204 : लालूप्रसादांची पोस्ट ही समस्त देशवासीयांची भावना, ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -