घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मोदींना पंतप्रधान करायचंय का? अंधारेंचा...

Lok Sabha 2024 : भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मोदींना पंतप्रधान करायचंय का? अंधारेंचा हल्लाबोल

Subscribe

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपींच्या यादीत शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचेही नाव होते. मात्र, शिवसेनेतील बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याने त्यांची सुरू असलेली चौकशी थांबली. अशात, आज (30 एप्रिल) लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Lok Sabha Election 2024 Shiv Sena Thackeray Group Leader Sushma Andhare Slams Yamini Jadhav And Kirit Somaiya)

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरच्या माध्यमांतून यामिनी जाधव यांच्यासह भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “या त्याच यामिनी जाधव आहेत ज्यांच्यावर व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्यांनी ढीगाने भ्रष्टाचाराचे आरोप केले. ED, इन्कमटॅक्सच्या रेडमध्ये करोडो सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या”, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. तसेच, भक्तूल्यांनो मोदींना पंतप्रधान अशा भ्रष्टाचाऱ्याना संरक्षण देण्यासाठी करायचे आहे का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढतीपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईचा तिढा आता सुटला असून महायुतीकडून शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असे एकेकाळचे सहकारी आणि सध्या वेगवगेळ्या पक्षात असलेले दोन शिवसैनिक एकमेकांना भिडणार आहेत.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबई शिवसेनेकडेच, यामिनी जाधवांना उमेदवारी जाहीर

- Advertisement -

कोण आहेत यामिनी जाधव?

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. मुंबई महापालिकेत अनेक वर्षे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यामागे असलेला ईडीचा ससेमिरा काही प्रमाणात थांबल्याचे सध्याचे चित्र आहे.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : दक्षिण मुंबई लढायची भाजपाला इच्छा होती, पण…; फडणवीसांनी व्यक्त केली खंत

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -