घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : मला त्यांच्यापेक्षा..., उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : मला त्यांच्यापेक्षा…, उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नागपूर : हे टरबूज नाहीत, ते दिवाळीत पायाखाली चिरडले जाणारे चिराटं आहेत. आले तेव्हा मुख्यमंत्री होते, पण आता पाव उपमुख्यमंत्री झाले, अशी जहरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. 29 एप्रिल) केली. त्यांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मी नागपुरीया आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येते. मात्र, मला ते शोभत नाही, असे प्रत्युत्तर फडणवीसांकडून देण्यात आले आहे. नागपूर विमानतळ येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. (Maharashtra Politics Devendra Fadnavis response to Uddhav Thackeray criticism)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची निराशा आणि हताशा झाली आहे. त्यातूनच नसलेले मुद्दे आणि अनेक कारणांमुळेच ते अशाप्रकारे बोलत आहेत. मात्र, मी मूळचा नागपूरचा असून अस्सल नागपुरी आहे. मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येते. मात्र, मला ते शोभत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा… Ravindra Waikar : माझं काम हाच माझा ब्रँड; उमेदवारी मिळाल्यावर वायकरांकडून विजयाचा विश्वास

तसेच, जे मॅच्युअर्ड राजकारणी असतात त्यांनी असे बोलायचे नसते. आज घडीला मला असे वाटते की, समोर आपली हार दिसते आहे. दिवसेंदिवस निराशा वाढते आहे आणि त्यातूनच आता शिवराळ भाषा सुरू झाली आहे. मात्र, त्यांनी किती शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही, असे सणसणीत प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. यावेळी फडणवीसांनी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपावरही आपले मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत म्हटले होते की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक त्रास हा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राणेंच्या या आरोपाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सुरुवातीच्या काळात नारायण राणे हे शिवसेना पक्षात होते. तसेच ते बाळासाहेबांच्या सर्वाधिक जवळचे होते. त्यावेळी आम्ही तेथे नव्हतो. मात्र, नारायण राणे जर असे म्हणाले असतील तर त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्याकडे असलेली माहितीच्या आधारे ते बोलले असतील, असे फडणवीसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबई शिवसेनेकडेच, यामिनी जाधवांना उमेदवारी जाहीर


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -