घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : 15 मार्च रोजी निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक; लोकसभेच्या...

Lok Sabha 2024 : 15 मार्च रोजी निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक; लोकसभेच्या तारखा होणार जाहीर?

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठींकडून मतदारसंघांतील कामांचा आढावा घेतला जात आहे. कारण आता कधीही लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 15 मार्च रोजी निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठींकडून मतदारसंघांतील कामांचा आढावा घेतला जात आहे. कारण आता कधीही लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 15 मार्च रोजी निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे देशातील लोकसभेच्या निवडणुका या 18 मार्च किंवा त्यानंतर जाहीर होण्याची शक्यता असून 15 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याते सांगितले जात आहे. (lok sabha elections be announced on march 18 code of conduct meeting of election commission on 15th march)

आगामी लोकसभा या सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. कारण या निवडणुकांपूर्वी देशातील प्रत्येक राज्यात खासदार आणि आमदारांच्या फोडाफोडीचे राजकारण झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनतेचा कौल महत्त्वाचा असणार आहे. अशातच निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात 15 मार्चला बैठक पार पडणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या नियुक्ती संदर्भात समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करणार आहे. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DOPT) सचिव यांचा समावेश असेल. तसेच, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील.


हेही वाचा – Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -