घरताज्या घडामोडीOscar Awards 2024 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमर चित्रपटाचा गाजावाजा; 7 पुरस्कारांवर...

Oscar Awards 2024 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमर चित्रपटाचा गाजावाजा; 7 पुरस्कारांवर कोरलं नाव

Subscribe

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑस्कर पुरस्कार सोहळा 2024 ची दमदार सांगता झाली. जगभरातील अनेक चित्रपटप्रेमी या सोहळ्याच्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सोहळा दिमाखात पार पडला असून विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर 'ओपनहायमर' चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑस्कर पुरस्कार सोहळा 2024 ची दमदार सांगता झाली. जगभरातील अनेक चित्रपटप्रेमी या सोहळ्याच्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सोहळा दिमाखात पार पडला असून विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे. ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. तसेच, या सोहळ्यात सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला, तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. (oscars 2024 winners from the 96th academy awards oppneheimer los angeles jimmy kimmel christopher nolan)

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2024) सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे 96 वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या सुपरहिट सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार Hoyte Van Hoytema याला मिळाला. त्याशिवाय, बेस्ट एडिटींगचा पुरस्कार जेनिफिर लेन याला मिळाला.

ओपेनहायमर चित्रपटाला कोणकोणते पुरस्कार मिळाले?

  • ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपेनहायमर’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
  • सिलियन मर्फीने ‘ओपेनहाइमर’मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला आहे.
  • Ludwig Göransson ला ‘ओपनहायमर’ साठी या वर्षीचा सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर ‘ओपनहायमर’ चित्रपटाला मिळाला आहे.
  • सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगसाठी ‘ओपनहायमर’ला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
  • रॉबर्ट डाउनी ज्युनियरला ‘ओपेनहायमर’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा त्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे.

दरम्यान, अॅव्हेंजर सीरिजमधील आर्यनमॅन रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर (Robert Downey Jr) याला आपल्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार (Oscars 2024 ) मिळाला आहे. ‘ओपनहायमर’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. रॉबर्ट डाउनी ज्यूनिअरला आतापर्यंत तीन वेळेस ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा – राखी बुरख्याच्या आत बिकिनी…फराह खानने सांगितला अतरंगी किस्सा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -