घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha : मावळच्या उमेदवारीवर श्रीरंग बारणे ठाम, मात्र राष्ट्रवादीचा विरोध

Lok Sabha : मावळच्या उमेदवारीवर श्रीरंग बारणे ठाम, मात्र राष्ट्रवादीचा विरोध

Subscribe

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकांसाठी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका घेताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे उमेदवाराबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. पुण्यातील मावळ लोकसभेतून महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळमधून मीच महायुतीचा उमेदवार असे ठामपणे सांगितले आहे. मात्र त्यांनी कमळावर की धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार याबाबत संदिग्धता कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला अजित पवार गटाने विरोध दर्शविला आहे. (Lok Sabha Srirang Barane stands firm on Mavals candidature but NCP opposes it)

हेही वाचा – Uddhav Thackeray : श्रीरामासंदर्भात ए राजांच्या वादग्रस्त विधाननंतर भाजपाने ठाकरेंवर साधला निशाणा

- Advertisement -

पिंपरीत कमळाचा उमेदवार असायला हवा, मग श्रीरंग बारणे असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका भाजपाने घेतली होती. त्यामुळे श्रीरंग बारणे भाजपाचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभा मतदार होती. याचपार्श्वभूमीवर मावळमधील महायुतीचा उमेदवार कोण असेल असं विचारल्यावर श्रीरंग बारणे ठामपणे म्हणाले की, महायुतीकडून भाजप, शिवसेनेसोबत सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे अजित पवार या महायुतीच्या घटकपक्षांचा उमेदवार काही दिवसातच स्पष्ट होईल. त्यात महायुतीचा उमेदवार मीच असेल, असे ठामपणे सांगितले आहे. याचवेळी त्यांना कमळ की धनुषबाण चिन्हावर लढवणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी महायुतीचा उमेदवार मीच असेल असे म्हणते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत संदिग्धता कायम ठेवली आहे.

संजोग वाघेरेंची उडवली खिल्ली

ठाकरे गटाने मावळमधील उमेदवारी जाहीर करताना संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर संजोग वाघेरे यांनी माझी थेट लढत भाजपासोबत असे वक्तव्य केले आहे. याच विधानावर बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले की, ज्या उमेदवाराचा मला थानपत्ता नाही, त्या उमेदवारासंदर्भात मी काहीही बोलू इच्छित नाही. मावळमधून भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी मिळाली तर लढणार का?, असं विचारल्यास बारणे म्हणाले की, या संदर्भात कोणतंही वक्तव्य आताच करणं उचित ठरणार नाही. मात्र मावळमधून मीच उमेदवार असणार असा पुनरुच्चार श्रीरंग बारणे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule : पवार कुटुंबातले सगळे भाऊ माझ्यासाठी उभे राहतात; सुळेंचे सूचक वक्तव्य

अजित पवार गटाकडून बारणेंच्या उमेदवारीला विरोध

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते की, कमळाच्या चिन्हावर श्रीरंग बारणे उमेदवार असतील, तर आमची हरकत नसेल. मात्र मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मावळमधून श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. बारणेंना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी का देऊ नये, यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवला आहे. याशिवाय मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला द्यावी, अशी मागणी देखील केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -