घरमहाराष्ट्रNagpur Voting : नागपूरमध्ये सरासरी ५3.१३ टक्के मतदान

Nagpur Voting : नागपूरमध्ये सरासरी ५3.१३ टक्के मतदान

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता आणि आई यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकाराशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, देशात मजबूत सरकार आणण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन केले. भारत ही जगातील मोठी लोकशाही आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा. पुढच्या ५ वर्षाकरिता देशाचा कारभार सक्षम हातात देण्यासाठीची ही निवडणूक आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.


नागपूरमध्ये खासदार डॉ. विकास महात्में यांनी सायकलवर जाऊन मतदान केले नागपूरच्या विवेकानंद नगर मनपा शाळातील मतदान केंद्रावर १ तास रांगेत उभे राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

नागपूरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५६ टक्के मतदान झाले आहे.


केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. त्यांनी  सहकुटुंब मतदान केले असून त्यापूर्वी त्यांनी घरच्या देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबियही उपस्थित होते. मतदानानंतर माध्यमांना प्रतिक्रीया देताना नितीन गडकरी म्हणाले की, आपला देश हा जगात लोकशाहीसाठी ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाच्या उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन मी करतो. मोठ्या संख्येने लोकांनी मतदान करावे. गेल्या पाच वर्षात माझ्या मतदार संघात मी जी काम केली, मला लोकांनी जे भरभरून प्रेम दिलं. तसंच प्रेम ते कायम ठेवतील, अशी माझी आशा आहे.

- Advertisement -


सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी लवकरच ते मतदान केंद्रावर हजर झाले होते. नागपूर येथील मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केल्याची निशाणी दाखवत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

लोकसभा २०१९ निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. नागपूर मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी मतदानाला सुरुवात केली आहे. या मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्या लढत होणार आहे. हा मतदारसंघ खुल्या वर्गासाठी राखीव असून येथे एकूण १० लाख ८३ हजार ६०४ मतदार आहेत. यामध्ये ५ लाख ०४ हजार ८५० महिला तर ५ लाख ७८ हजार ७५४ पुरुष इतके मतदार आहेत.

10-Nagpur-Lok-Sabha-Constituency-1

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -