घरमहाराष्ट्रLoksabha 2024: रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे; अजित पवारांनी सुनील तटकरेंच्या नावावर केलं...

Loksabha 2024: रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे; अजित पवारांनी सुनील तटकरेंच्या नावावर केलं शिक्कामोर्तब

Subscribe

रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेच लढवणार, हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

रायगड: रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेच लढवणार, हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे भाजपाने रायगडच्या जागेवर केलेला दावा, अजित पवार यांनी मोडीत काढला आहे. अजित पवार हे शनिवारी म्हसळा येथे बोलत होते, यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे. 43 कोटी रुपये खर्चाच्या म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. (Loksabha 2024 Raigad Lok Sabha seat to NCP Ajit Pawar sealed the name of Sunil Tatkare)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अदिती तटकरे यांनी तहसील कार्यालयातील इमारत, नगरपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

- Advertisement -

या सभेत अजित पवारांनी रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेच उमेदवार आहेत, कामाला लागा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत रायगड लोकसभेच्या वादावर पूर्णविराम दिला. भाजपाकडून इच्छुक उमेदवार धर्यशील पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांच्याकडून भाजपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समजूत घातल्याचं समोर आलं आहे. त्याशिवाय यावेळी अजित पवारांनी मराठा आरक्षणावर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी 20 फेब्रुवारीला स्पेशल अधिवेशन भरवणार असल्याचेही सांगितलं.

महायुतीतील लोकसभा निवडणुकीसाठी जागांचे वाटप झालेले नाही. मात्र, रायगडच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू होती, शनिवारी अजित पवार यांनी ही जागा आपलीच आहे, असं सांगत प्रचाराला लागा, असं सांगितलं आहे.

- Advertisement -

सुनील तटकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या या भूमीत राष्ट्रवादी पक्ष वाढवला. त्यांना कार्यकर्त्यांनी बळ दिले म्हणून आज रायगडमध्ये आपल्या पक्षाची नाळ गावागावांत जोडली गेली आहे, असं ते म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष व नगरसेवक अनिकेत पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

(हेही वाचा: Live Update: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा स्थगित; प्रवास अर्धवट सोडून वायनाडला रवाना)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -