घरताज्या घडामोडीLoksabha 2024: कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यातशुल्क, केंद्राने शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली;...

Loksabha 2024: कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यातशुल्क, केंद्राने शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली; कोल्हेंचा आरोप

Subscribe

शिरुर –  कांदा निर्यातबंदी उठवली पण 40 टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचे काम केंद्र सरकारने केलं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर टीका केली.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज (शनिवार) शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर, दामु घोडे, अरुणा घोडे, स्वप्नील गायकवाड, रामदादा गावडे, गणेश जामदार उपस्थित होते.

- Advertisement -

डॉ. कोल्हे म्हणाले की, कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी हा समाधानकारक निर्णय नसून एका हाताने द्यायचे अन दुसऱ्या हाताने काढुन घ्यायचे असे काम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

हेही वाचा : Loksabha Election 2024: दिल्लीश्वरांची राजकीय कबर महाराष्ट्रच खोदणार; बारामतीत भास्कर जाधव कडाडले

- Advertisement -

अस्मानी संकट आणि केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणामुले कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. हे सर्व पाहता केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी (3 मे) रात्री एक पत्रक जारी करत कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी तसेच निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र दुसरीकडे राजकारणाला देखील तोंड फुटले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात कांद्यावरची निर्यात खुली करण्यात आली असून हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024: अजित पवार भा** माणूस; बारामतीत महादेव जानकर हे काय बोलून गेले


Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -