घरदेश-विदेशLPG Cylinder Price : बजेटच्या दिवशीच महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किंमती...

LPG Cylinder Price : बजेटच्या दिवशीच महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किंमती वाढल्या

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ( ता.1 फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेट सादर होण्यापूर्वीच महागाईचा भडका उडाला आहे. LPG सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.  तेल विपणन कंपन्यांमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 14 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1769.50 रुपये झाली. गॅस सिलिंडरचे नवे दर आजपासून (1 फेब्रुवारी) लागू करण्यात आले आहेत.

एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीमध्ये वाढ झाली झाली आहे. मुंबईमध्ये या पूर्वी 1708 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आता 1723 रुपयांना मिळेल. दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडची किंमत 1755.50 रुपयांवरून 1769.50 रुपये झाली आहे. तर कोलकातामध्ये सिलिंडरच्या किमतीमध्ये 1869.00 रुपयांवरून 1887 रुपये करण्यात आला आहे. चेन्नईमध्ये 1924.50 रुपयांवरून 1937 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Union Budget 2024 : अंतरीम अर्थसंकल्पात ‘या’ घोषणा होण्याची शक्यता ? वाचा सविस्तर

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला असून, घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र स्थिर आहेत. मुंबईत 14.2 किलोच्या LPG सिलिंडरची किंमत 902.50 रुपये, दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये तर चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे.

- Advertisement -

सरकारी तेल कंपन्यांनी 1 जानेवारी 2024 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किमत कमी करण्यात आली होती. गेल्या महिन्यात LPG सिलिंडरच्या किमतीत अत्यंत किरकोळ कपात करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात देशातील काही शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरचा दर दीड रुपयांनी कमी करण्यात आला होता. जानेवारीमध्ये 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती LPG च्या दरांत शेवटचा बदल 30 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -