घरमहाराष्ट्रनाशिकSanjay Raut : अद्वय हिरे कर्ज फेडायला तयार, पण...; संजय राऊत यांनी...

Sanjay Raut : अद्वय हिरे कर्ज फेडायला तयार, पण…; संजय राऊत यांनी भाजपा अन् दादा भुसेंवर साधला निशाणा

Subscribe

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे (Advaya Hire) यांनी रेणुकादेवी सुत गिरणी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून कर्ज थकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी 15 नोव्हेंबर रोजी अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक केली. दरम्यान, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अद्वय हिरे यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपा (BJP) आणि दादा भुसेंवर (Dada Bhuse) निशाणा साधला. (Advaya Hire is ready to pay the loan Sanjay Raut targeted BJP and Dada Bhuse)

संजय राऊत म्हणाले की, अद्वय हिरे यांनी कर्ज घेतलं, पण ते कर्ज फेडायला तयार आहेत. तसं त्यांनी बँकेला कळवलं आहे. आम्हाला हप्ते बांधून द्या असं त्यांनी सांगितलं आहे. ज्या कारखान्यावर त्यांनी कर्ज घेतलं आहे. तो कारखाना विकत घेण्यासाठी काही पार्टी आलेल्या आहेत. व्यवहार होऊ शकतो, पण बँक परवानगी नाकरत आहे. हे मुद्दाम होत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Macau Casino : …म्हणून आम्ही एका फोटोवर थांबलो; बावनकुळेंच्या आरोपावर संजय राऊत यांचे जोरदार प्रत्युत्तर

अद्वय हिरे भारतीय जनता पक्षामध्ये होते, तेव्हाही हे प्रकरण होते, अशी माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, मुळात हा सहकार खात्याचा विषय आहे. सहकार खातं यावर आक्षेप घेऊ शकतो. पण ज्या पद्धतीने अद्वय हिरे यांना या प्रकरणी अटक केली, हे फक्त मालेगाव केंद्रीत राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत 2024 रोजी अद्वय हिरे हे मालेगावचे आमदार होतील. तुम्ही कितीही अडथळे आणा, दादा भुसे यांचा दारुण पराभव होणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते आज अद्वय हिरे यांना भेटण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

अद्वय हिरे हे शिवसेना कुटुंबातले घटक आहेत. मी असेन, उद्धव ठाकरे असतील आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. मी खास त्यांना भेटण्यासाठी इथे आज आलो. जेव्हा अशाप्रकारे निशाणा साधला जातो, तेव्हा कुटुंबावर आणि स्वत: मानसिक काय अवस्था असते. त्यामुळे मी त्यांना धीर द्यायला आलो की, तुम्ही यातून बाहेर पडाल. कारण शेवटी हे राजकीय षडयंत्र आहे, ते उधळलं जाईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Maharashtra Sadan Scam : …त्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगात गेले; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

फडणवीसांनी बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा अभ्यास करावा

प्रत्येकाची श्रद्धा-अंधश्रद्धा असते, 22 तारखेला मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्धाटन होत आहे. काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबाने तुकाराम महाजारांवर केलेलं वक्तव्य महाराष्ट्रात आणि त्याच्याआधी प्रभू श्रीराम आणि त्यांचे वडील यांच्याविषयी केलेलं वक्तव्य याचाही अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे. त्याचं हिंदुत्व त्यांच्यापाशी आणि आमचं हिंदुत्व आमच्यापाशी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -