Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी MVAच्या नेत्यांची शरद पवारांसोबत बैठक, नाना पटोले म्हणाले, 'वज्रमूठ सभा पुन्हा सुरु...

MVAच्या नेत्यांची शरद पवारांसोबत बैठक, नाना पटोले म्हणाले, ‘वज्रमूठ सभा पुन्हा सुरु होणार’

Subscribe

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार यांच्या निवास्थानी बैठक पार पडली. कर्नाटक निवडणूक आणि सत्तासंघर्षवरील निकालावर या बैठकित चर्चा करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली.

‘सध्या उन्हाळा सुरू असून तो कमी झाल्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पुन्हा सुरू करू’, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार यांच्या निवास्थानी बैठक पार पडली. कर्नाटक निवडणूक आणि सत्तासंघर्षवरील निकालावर या बैठकित चर्चा करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. (Maha vikas aghadi Vajramuth Sabha will resume Says Nana Patole)

या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच “दिल्लीचे झूठ आणि कर्नाटकाची लूट’ या सगळ्या गोष्टीची कर्नाटकाच्या जनतेप्रमाणे देशाच्याही जनतेला ओळख झाली आहे. कर्नाटकातील विजयाचे चित्र आपण सर्वत्रच पाहिले. कर्नाटकाच्या जनतेमध्ये भाजपा, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याविरोधातील जो राग होता, तो त्याठिकाणी स्पष्ट झाला”, असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

“कर्नाटकात 40 टक्के कमिशन सरकार म्हणून भाजप चर्चेत होते. तर महाराष्ट्रात खोके सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार कर्नाटकातील सरकारपेक्षा भ्रष्टाचारी आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेचे पैसे लुटण्यासाठी हे सरकार बसलेले असून, महाराष्ट्राती जनता हे ओळखते”, असेही नाना पटोले म्हणाले.

“पुढच्या काळात महाराष्ट्रातील भाजपाचे असलेले असंवैधानिक सरकारचे पाणीपत कसे करता येईल, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय विधानसभा अध्यक्षाला दिलेले काळात त्यांनी निर्णय जाहीर केला पाहिजे. त्यामाध्यमातून हे महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार निर्माण झाले. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार हद्दपार करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून हे संपल्यानंतर वज्रमुठ सभाही पुन्हा सुरू करू”, असेही नाना पटोले म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – Karnataka Assembly Election : कर्नाटकात मुख्यमंत्री कोण? ठरवण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या ‘या’ नेत्यावर

- Advertisment -