Karnataka Assembly Election : कर्नाटकात मुख्यमंत्री कोण? ठरवण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या ‘या’ नेत्यावर

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी काँग्रेसने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्या मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापुरहून विशेष विमानाने बंगळुरुला रवाना झाले आहेत.

next congress party president sushilkumar shinde likely to be next congress president
काँग्रेस अध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर?

Karnataka Assembly Election 2023 नवी दिल्ली/सोलापूर – कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी काँग्रेसने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्या मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापुरहून विशेष विमानाने बंगळुरुला रवाना झाले आहेत.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले आहे. २२४ पैकी १३५ जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पराभव स्वीकारला असून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस समोर आता आव्हान आहे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्याचे. त्यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केली असून त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

सुशीलकुमार शिंदे रविवारी दुपारी चार वाजता विशेष विमानाने बंगळुरुला रवाना झाले आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार आणि ज्येष्ठ नते माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा आहे. या दोन्ही पैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

हेही वाचा :काँग्रेस सरकार येताच नव्या सीबीआय संचालकाची नियुक्ती; डीजीपी प्रवीण सूद यांना संधी

कोण होणार मुख्यमंत्री ?
कर्नाटमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भाजपला धूळ चारुन काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमैय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्या नावांची चर्चा आहे. यावरुनच कर्नाटक काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

सिद्धरमैय्या हे अनुभवी आहेत. शासन आणि प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे. २०१३ ते २०१८ दरम्यान ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. अलीकडच्या काळात पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. जनता दल, जेडी(एस), काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

डी.के.शिवकुमार हे काँग्रेसमधील मनी अँड मसल पॉवर असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना काँग्रेसचे संकटमोचकही म्हटले जाते. महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचे सरकार संकटात सापडले होते, तेव्हा शिवकुमार यांनीच रिसॉर्ट पॉलिटिक्स करुन ते सरकार वाचवले होते. देशात कुठेही काँग्रेसच्या सरकारमध्ये सत्तापेच निर्माण झाला तर संकटमोचक म्हणून शिवकुमार यांची आठवण काँग्रेसनेत्यांना होते. त्यांचाही मुख्यमंत्रीपदावर दावा आहे.

सुशीलकुमारांसाठी विशेष विमान 

कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पक्षाचा नवा विधीमंडळ नेता ठरवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने तीन जणांची समिती नियुक्त केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र सिंग, दीपक बाबारिया यांचा समावेश आहे. शिंदे हे रविवारी सोलापूरमध्ये होते, त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी.वेणुगोपाल यांचा फोन आला. पक्षाने त्यांच्यासाठी विशेष विमान पाठवले आणि ते दुपारी सोलापुरातून बंगळुरुसाठी रवाना झाले.

काँग्रेसच्या वाढलेल्या हलचाली पाहाता कर्नाटकमध्ये लवकरच सरकार स्थापन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.