घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: हिवाळी अधिवेशनात २४ विधेयके मंजूर, उपमुख्यमंत्री अजित...

Maharashtra Assembly Winter Session 2021: हिवाळी अधिवेशनात २४ विधेयके मंजूर, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

Subscribe

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात पाच दिवसांमध्ये जवळपास २४ विधेयके चर्चा करुन मंजूर केली आहेत. १ विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले आहे. गृहविभागाचे ते बिल आहे. तीन विधेयक कृषीच्या बाबत होते. केंद्राने आणलेले बिल मागे घेतले आहे. असे एकूण २८ विधेयकांवर चर्चा झाली. लक्षवेधी आणि इतर कामकाजादरम्यान गोंधळ झाले मात्र बऱ्यापैकी कामकाज पार पडलं आहे. थोडा गोंधळ झाला परंतु बऱ्यापैकी कामकाज झाले आहे. सगळी बिले महत्त्वाची होती. शक्ती विधेयक ऐतिहासिक आहे. यामुळे महिलांबाबतचे प्रश्न सुटणार आहेत. याबाबत बरेच दिवस चर्चा झाली होती अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये असा ठराव केला आहे. तो ठराव राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. या अधिवेशनात ३१ हजार २९८ कोटी २६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या आहेत. इम्पेरिकल डेटा संकलित करण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये ४३५ कोटी मान्य केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई महाराज यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधी स्थळ परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : CAG: फडणवीस सरकारचा १ लाख २८ हजार कोटींचा कर्जभार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -