घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: अटकेत असलेल्या महिला शिक्षकांची सुटका करा, प्रवीण...

Maharashtra Assembly Winter Session 2021: अटकेत असलेल्या महिला शिक्षकांची सुटका करा, प्रवीण दरेकरांची विधान परिषदेत मागणी

Subscribe

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आझाद मैदानाकडे येणाऱ्या शिक्षक संघटनेच्या महिला शिक्षिकांना मुलुंड चेक नाका येथे अडवण्यात आले. या महिलांना आझाद मैदान येथे जाण्यापासून मज्जाव करण्यात आला व त्या महिलांना नवघर पोलीस ठाण्यात डांबण्यात आले. ही गंभीर बाब विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्या महिलांना तातडीने सोडण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले.

शिक्षकांना त्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षकांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनस्थळी येण्यासाठी मुलुंडवरून ४०-५० महिला आझाद मैदानाकडे निघाल्या होत्या. पण पोलिसांनी या महिलांना जबरदस्तीने ताब्यात घेतले व त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली. त्यामुळे त्या महिलांना तातडीने सोडण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरकरे यांनी केली. दरेकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा विषय मांडला.

- Advertisement -

लोकशाहीच्या माध्यमातून न्याय मागण्याचा सर्वांचा हक्क आहे. पण आंदोलनासाठी उपस्थित राहण्यासाठी जाणाऱ्या शिक्षिकांना पोलिसांनी ताब्यात घेणे हे अन्यायकारक आहे. हे आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. शिक्षिकांच्या मागण्यांबाबत सर्वंकष विचार करून यामध्ये तोडगा काढण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सभागृहात दिले.


हेही वाचा : MPSC Exam: २०१९मध्ये उत्तीर्ण झालेल्या ४१३ विद्यार्थ्यांची नियुक्ती, ‘या’ दिवशी होणार प्रशिक्षण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -