घरमहाराष्ट्र'चोरांना चोरी करता येत नाही, म्हणून चोर एकत्र येताय'

‘चोरांना चोरी करता येत नाही, म्हणून चोर एकत्र येताय’

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. 'चोरांना चोरी करता येत नाही, म्हणून चोर एकत्र येताय', अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

‘चोरांना चोरी करता येत नाही, म्हणून चोर एकत्र येताय’, अशा शब्दात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस इत्यादी पक्षांकडून ‘भाजप हटाव’चा नारा दिला जात आहे. यासाठी त्यांनी महागठबंधन म्हणजे महाआघाडीची निर्मिती केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. भाजपकडून मुंबई येथे सीएम चषक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राजीव गांधी यांच्या जमान्यात ९५ हजारे कोटी रुपये व्यस्था खात होती. हे पैसे इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या जमान्यात खाल्ले जात होते’. परंतु, ‘आता मोदी सरकारच्या काळात चोरांना चोरी करता येत नाहीए, त्यामुळे चोर एकत्र येत आहेत’, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -