घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास, छोट्या शस्त्रक्रियेची गरज

मुख्यमंत्र्यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास, छोट्या शस्त्रक्रियेची गरज

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास बळावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर छोटीशी शस्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माहितीनुसार एच.एन रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांवर छोटी शस्त्रक्रिया होणार असून डॉ. शेखर भोजराज शस्रक्रिया करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीवर घरगुती उपचार सुरू होते. मात्र घरगुती उपचार करून त्यात सुधारणा होत नसल्यामुळे शस्रक्रियेचा पर्याय सुचवण्यात आला आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करायची की नाही? याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्वतः घ्यावा, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या काही शारीरिक चाचण्या करण्यात आल्या.

- Advertisement -

माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास होत असल्यामुळे अनेक भेटीगाठी टाळल्या. तसेच त्यांनी दिवाळीनिमित्ताने निवासस्थानी येणाऱ्या पाहुण्याकडून येणाऱ्या शुभेच्छा देखील टाळल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचा हा त्रास बळावत असल्यामुळे शस्रक्रियेची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील उपचाराकरिता मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -