घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ९,५५८ नव्या रुग्णांची वाढ, १४७ जणांचा...

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ९,५५८ नव्या रुग्णांची वाढ, १४७ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात सातत्याने नव्या रुग्णसंख्येत, मृत्यूच्या संख्येत आणि रुग्ण बरे होण्याच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ५५८ नव्या कोरोनाबाधित आढळले असून १४७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख २२ हजार ८९३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात राज्यातील ८ हजार ८९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५८ लाख ८१ हजार १६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ३१ लाख २४ हजार ८०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख २२ हजार ८९३ (१४.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३४ हजार ४२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ६४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Coronavirus : कोरोनाचा ‘हा’ नवा व्हेरियंट ठरतोय अतिशय आता धोकादायक, शरीरातील प्लाझ्मापासून ते अँटीबॉडी करतोय कमी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -