घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मिळेल ती जबाबदारी स्वीकारणार, मंत्रिपद शपथविधीनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मिळेल ती जबाबदारी स्वीकारणार, मंत्रिपद शपथविधीनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

Subscribe

महाराष्ट्राला मंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न करेल - नारायण राणे

भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिपद दिल्यामुळे आनंद वाटत असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो असल्याचे राणेंनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळेल ती जबाबदारी स्विकारणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानतंर नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपन नेते नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, एवढ्या वर्षाचा प्रवास दोन वाक्यात सांगणं शक्य नाही. आज सांगयाला आनंद वाटत आहे की, प्रथम १९८५ मध्ये नगरसेवक झालो त्यानंतर बीएमसी चेअरमन आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि आता केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे आणि त्यांच्यामुळे मंत्रिमंडळात सहभाग होऊ शकला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ते देतील ती जबाबदारी संभाळीन त्यांच्या अज्ञेप्रमाणे काम करेल महाराष्ट्राला मंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असं नाराणय राणे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणार

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री १९९९ मध्ये झालो त्यानंतर अनेक चढउतार आले. पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा याच्या कृपेने, आशिर्वादाने मला मंत्रिपद मिळालं आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच मराठा आरक्षण न मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. मराठा आरक्षणासाठीही मी प्रयत्न करणार आहे. असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -