घरमहाराष्ट्रनाशिकसिटी बससेवेचा उद्या शुभारंभ, तिकीट बुकिंगला ऑनलाईन पर्याय

सिटी बससेवेचा उद्या शुभारंभ, तिकीट बुकिंगला ऑनलाईन पर्याय

Subscribe

बससेवेच्या उदघाटनानिमित्त देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या शहर बससेवेचा शुभारंभ गुरूवारी (दि.८) पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गेल्या १० वर्षांपासून बससेवेच्या मुद्द्यावरुन एसटी महामंडळ आणि महापालिका यांच्यात टोलवाटोलवी सुरू होती. मात्र, आता बहुप्रतिक्षित सेवेची प्रतीक्षा संपल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या बससेवेचे तिकीट ऑनलाईनदेखील बूक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कालिदास कलामंदिर येथे दुपारी १२ वाजता आयोजित या सोहळयानिमित्ताने फडणवीस आणि भुजबळ हे दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्यादेखील हा कार्यक्रम नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करतांनाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलू असे आश्वासन दिले होते. नाशिकची बससेवा ही फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकीच एक. या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीदेखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -