घरक्राइमMaharashtra News : गडचिरोलीतील चकमकीत चार नक्षलींचा खात्मा, हत्यारांचा साठा हस्तगत

Maharashtra News : गडचिरोलीतील चकमकीत चार नक्षलींचा खात्मा, हत्यारांचा साठा हस्तगत

Subscribe

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आज, पहाटे गडचिरोलीच्या कोलामारका जंगलात नक्षलवाद्यांसमवेत चकमक झाली. यात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. महाराष्ट्र सरकारने नक्षलवाद्यांवर एकूण 36 लाख रुपयांचे रोख बक्षीस ठेवले होते.

हेही वाचा – Thackeray vs BJP : ठाकरेंचे देशभक्त चालत नाही, पण…, व्हिडीओद्वारे ठाकरे गटाचा भाजपाला टोला

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना घातपाती कारवाया घडविण्याच्या उद्देशाने शेजारच्या तेलंगणातून काही नक्षलवादी प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीत दाखल झाल्याची खबर सोमवारी दुपारी पोलिसांना मिळाली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

- Advertisement -

त्यानुसार, अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी60 आणि सीआरपीएफ क्यूएटीच्या विविध पथकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम सुरू केली. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या रेपनपल्लीच्या सबपोलीस स्टेशनपासून 5 किमी अंतरावर कोलामारका पर्वतांमध्ये शोध घेत असताना आज, मंगळवारी पहाटे सी60ची चार पथके असलेल्या टीमवर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्याला सी60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

नक्षलवाद्याकडून गोळीबार थांबताच, परिसराचा शोध घेतला असता, चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.. डिव्हिजनल कमिटी मेंबर वर्गिश आणि मंगतू तसेच प्लाटून सदस्य कुरसंग राजू आणि कुदीमेट्टा व्यंकटेश अशी या नक्षलवाद्यांची नावे असून त्यांच्याकडील एके-47, एक कार्बाइन आणि दोन देशी बनावटीच्या पिस्तूल, नक्षलवादाशी संबंधित साहित्य आणि स्फोटके हस्तगत करण्यात आले आहे. या चकमकीनंतर नक्षलविरोधी शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.

हेही वाचा – INDIA Vs NDA : मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या, ठाकरे गटाचा निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -