घरमहाराष्ट्रनाशिकRaj Thackeray : महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून...; राज ठाकरेंचे मराठा समाजाला...

Raj Thackeray : महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून…; राज ठाकरेंचे मराठा समाजाला आवाहन

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा 18वा वर्धापन दिन येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात भरगच्च गर्दीत साजरा झाला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा मेळावा महत्त्वाचा मानला जात होता. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आव्हान केले की, तुम्ही मराठी म्हणून एकत्र यायला नको म्हणून तुमच्यात विष कालवण्याचे जे धंदे आहेत ते ओळखा असे आव्हान केले आहे. (Maharashtra should not remain united Raj Thackerays appeal to the Maratha community)

हेही वाचा – Raj Thackeray : मनसेची लोकसभेसंबंधी भूमिका गुलदस्त्यात, राज ठाकरे या तारखेला फोडणार बॉम्ब

- Advertisement -

वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी जातीचे विष पसरवलं जात आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, तेव्हा मी त्यांच्यासमोर गेलो आणि त्यांना सांगितलं की, हे होणार नाही. परंतु होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नव्हता. पण तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नव्हते. मागे इतके मोर्चे निघाले पुढे काय झाले? महाराष्ट्रातील माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका, जी गोष्ट होऊ शकत नाही ती आश्वासने हे लोक देत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले की, आज मूळ प्रश्न शिक्षण आणि नोकरीचा आहे. पण महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण आणि नोकरी देऊ शकत नाही. बाहेरच्या लोकांना आमच्या राज्यात पोसायचं आणि आपल्याकडील लोक आंदोलन करत आहेत. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे सहज शक्य आहे. परंतु तुम्ही मराठी म्हणून एकत्र राहू नये, महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून वेगवेगळ्या जातीत विष कालवलं जात आहे, मराठा झाल्यावर ओबीसी आणि त्यानंतर आणखी काहीतरी वेगळं. परंतु तुमची जेवढी मते विभागली जातील तेवढं या लोकांसाठी फायद्याचं असणार आहे. तुम्ही मराठी म्हणून एकत्र यायला नको त्यामुळे तुमच्यात विष कालवण्याचे जे धंदे आहेत ते ओळखा, असं आव्हान राज ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – MNS Vardhapan Din: मला माझ्या कडेवर माझीच पोरं खेळवायची आहेत; राज ठाकरे असं का म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले की, हा फक्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विषय नाही तर प्रत्येक राज्यातील तिथल्या समाजाचा विषय आहे. एका जातीचा विषय कोर्टात गेला तर या देशातील प्रत्येक जाती उभ्या राहतील आणि आरक्षणाचा विषय अख्ख्या देशात पेटेल. परंतु आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होऊ शकत नाही. त्यासाठी लोकसभेचे अधिवेशन घ्यावे लागेल. त्यामुळे वकिलांशी बोला, मी खोटे सांगत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -