घरताज्या घडामोडीMaharashtra TET 2021: तुकाराम सुपेंसह २ जणांना अटक, ८९ लाखांची रोकड जप्त...

Maharashtra TET 2021: तुकाराम सुपेंसह २ जणांना अटक, ८९ लाखांची रोकड जप्त केल्याची पुणे पोलिसांची माहिती

Subscribe

आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटीचे प्रकरण हाताळत असताना शिक्षक पात्रता परिक्षेत म्हणजेच टीईच्या परिक्षेत (TET Exam) गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Tupe) यांच्यासह आणखी एकाला अटक केली आहे. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले. याप्रकरणातील आरोपींकडून ८९ लाख रुपयांची रोख ताब्यात घेतली आहे. तसेच या प्रकरणात बऱ्याच लिंक असून आणखीन काही जणांना अटक करण्यात येणार आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले.

‘सुरुवातीला आम्ही दोन पेपर फुटीचे प्रकरण हाताळत होतो. आरोग्य भरतीच्या परीक्षांचा तपास सुरू होता. त्याचा तपास करताना म्हाडाच्या परीक्षेची लिंक लागली आणि परीक्षा होण्यापूर्वी आम्ही आदल्या रात्री सर्वांना अटक केली. या प्रकरणाचा तपास करत असतानाच टीईटीच्या परीक्षेत गोंधळ असल्याचे समोर आले. यावेळी टीईटीच्या परीक्षेत गैरव्यवहार सुरू होता. त्यानुसार दोन जणांना अटक केली आहे. तुपे यांच्यासोबत आणखीन एकाला अटक केली आहे. या आरोपींना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे,’ असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

- Advertisement -

प्राथमिक अंदाजानुसार, आरोपी ३५ हजार ते १ लाखापर्यंत घ्यायचे. जवळपास साडे चार कोटी घेतल्यांचा अंदाज आहे. दरम्यान परीक्षेनुसार हे आरोपी पैसे घेत होते. आता आरोपींकडून ८९ लाख रुपये जप्त केले आहेत. तसेच काही सोनं आणि एफडी सापडले आहेत. याप्रकरणातील पुढील तपास सुरू आहे, असे अमिताभ गुप्ता म्हणाले.


हेही वाचा – TET Exam: टीईटी परीक्षेत लाच घेतल्याचा आरोप, MSEC चे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -