घरताज्या घडामोडीOBC Reservation : वेळ घालवल्यामुळे ओबीसींचं मोठं नुकसान, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया...

OBC Reservation : वेळ घालवल्यामुळे ओबीसींचं मोठं नुकसान, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया…

Subscribe

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यासह आम्ही निवडणूक आयोगाला भेट दिलेली आहे. जो विषय मी निवडणूक आयोगासमोर मांडणार आहे. तोच विषय आज मी राज्य सरकारला आपल्या माध्यातून आव्हान करणार आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून आहे. इम्पेरिकल डेटा कोणी करायचा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होता. सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिला असून इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यामध्ये वेळ अधिक घालवल्यामुळे ओबीसींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, इम्पेरिकल डेटा मिळाल्यानंतर आणि ओबीसी आरक्षणावर निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेतला जावा. असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असून त्याचा आम्ही सन्मान करतो. एससी आणि एसटी सोडून सर्व जागा खुल्या आहेत. त्यामुळे समान न्यायाच्या तत्वाप्रमाणे सगळ्या जागांवर कोणीही नामनिर्देशन करू शकतं.

- Advertisement -

खुल्या प्रवर्गातील लोकांना फॉर्म भरण्याची संधी

अध्यादेशावर विश्वास ठेऊन ओबीसी आरक्षणाचे वॉर्ड पडले असताना ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. असे असून देखील ओबीसींकडून ओबीसींचं नॉमिनेशन करण्यात आलंय. त्यामुळे आताच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासाठी राखून ठेवल्या आहेत. परंतु तिथे खुल्या प्रवर्गातील लोकांना फॉर्म भरण्याची संधी दिली जातेय. त्यामुळे ज्या ठिकाणांवर फॉर्म भरले गेले आहेत. त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाला आहे.

आरक्षण टिकलं नाही तर आम्ही रद्द करू

राज्य सरकारला मी तक्रार करणार असून ओबीसी आरक्षण टिकणार नाही अशी परिस्थिती असताना राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरक्षण टिकलं नाही तर आम्ही रद्द करू आणि सर्वांना समान न्यायाच्या तत्वाने संधी देऊ. अशी राज्य सरकारची भूमिका असायली पाहीजे होती. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी भाजपचं शिष्टमंडळ आज दुपारी १२ वाजता निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेणार होते. त्यानंतर वेळ घालवल्यामुळे ओबीसींचं मोठं नुकसान झालं आहे. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.


हेही वाचा : OBC Reservation : खुल्या प्रवर्गातील निवडणुका घेतल्यास ओबीसी समाजावर अन्याय – पंकजा मुंडे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -