घरताज्या घडामोडीमोठी बातमी! राज्यभरातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मोठी बातमी! राज्यभरातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

राज्यभरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गृह विभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच, काहींची पदोन्नती देत बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे.

राज्यभरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गृह विभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच, काहींची पदोन्नती देत बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पदोन्नती देण्यात आली आहे. (maharashtra transfers of 17 senior police officers in the state)

‘अशा’ आहेत IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

- Advertisement -

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत होते. निखील गुप्ता यांच्या बदलीचे विशेष आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय, दहशतवाद विरोधी पथकाचे अपर महासंचालक सदानंद दाते आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन यांचाही समावेश आहे. मल्लिकार्जुन यांची मुंबई विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता बृहन्मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डी.एस. चव्हाण यांच पदोन्नती होऊन बदली करण्यात आली आहे.

संभाजीनगरचे नवीन पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि नव्याने छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदलून आलेले डी.एस. चव्हाण या दोघांनी शहर पोलिसात यापूर्वी एसीपी म्हणून काम पाहिलेले आहे.


हेही वाचा – सुदानमधील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -